प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समितीत सरशी दादांची आणि चर्चा मात्र बाबांची : राष्ट्रवादीच्या संस्था गटाच्या वर्चस्वाला सुरुंग

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : निवडणूक बाजार समितीची पण कस लागला होता दोन युवा नेतृत्वाचां, राष्ट्रवादीकडे स्पष्ट बहुमत येईल इतकीं मतांची संख्या तर भाजपकडे फक्त एकत्रित केलेली घटक पक्षांची विजयाप्रत नेण्यासाठी अशाश्वत असलेली आघाडी.दोघांही तुल्यबळ युवा नेतृत्वांनी जिंकायचंच असा चंग बांधला, परंतु यात राष्ट्रवादीच्या रोहित पाटील यांनी बाजी मारली,पण म्हणतात कीं कोणत्याही विजयाची आशा नसताना लढणाऱ्याने अस लढावं कीं विजयापेक्षा पराजयाची चर्चा झाली पाहिजे;आणि झाले हि तसेच भाजपा युवा नेते प्रभाकर पाटील यांनी एकतर्फी वाटणारी निवडणूक ताकतीने लढा देऊन राष्ट्रवादीला घाम फोडण्याचे काम केले.तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेली तीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीं आर आर आबा गटाची निर्विवाद सत्ता आहे.यंदा ती कायम राखण्यात स्वर्गीय आर आर आबा यांचे पुत्र रोहित पाटील यांना यश आले,परंतु ग्रामपंचायत आणि सोसायटी संस्था गटात एकहाती वर्चस्व असून सुद्धा एका एका मतासाठी त्यांना संघर्ष करावा लागला.सुरुवातीला राष्ट्रवादीला सोपी वाटणारी निवडणुक शेवटच्या टप्प्यात अवघड जाणार असे चित्र तयार झाले. ग्रामपंचायत गटात राष्ट्रवादीचें वर्चस्व असल्यामुळे खासदार गटाने आपले सगळे लक्ष सोसायटी संस्था गटावर केंद्रित केले आणि राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करून राष्ट्रवादीला आव्हान दिले.तालुक्यातील सोसायटीत वर्चस्व असून सुद्धा किमान दीडशेच्या आसपास मताधिक्य मिळेल अशी अपेक्षा असताना फक्त तीस तें चाळीस मताने उमेदवार विजयी झाले.जवळपास शंभर मतांचे परिवर्तन करण्यात खासदार गटाला यश आले, खरं तर भाजप युवा नेते प्रभाकर पाटील यांच्यासाठी ही निवडणूक म्हणजे वादळात दिवा लावण्यासारखाच प्रकार होता. आणि लागलेल्या निकालाचे मताधिक्य पाहता. प्रभाकर बाबांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रवादीला घ्यावीच लागेल असा आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादीचें अठरा तर खासदार गटाचे फक्त एक संचालक व्यापारी गटातून विजयी झाले होते.त्यावेळी भाजप स्वतंत्र लढले होते;मात्र यावेळी तिसरी आघाडी आणि महाविकास आघाडी तील घटक पक्ष काँग्रेस आणि शिवसेना यांनी भाजपशी हातमिळवणी करून राष्ट्रवादी समोर आव्हान उभे केले होते,ग्रामपंचायत आणि सोसायटीत एकहाती वर्चस्व असल्याने निवडणुकीत सहजपने विजय मिळेल असा आत्मविश्वास राष्ट्रवादीला होता,परंतु खासदारांच्या नेतृत्वात असणाऱ्या काँग्रेस आणि इतर घटक पक्षांनी एकसंध राहून आक्रमक पने प्रचार यंत्रणा राबवून विजयाप्रत पोहोचण्यासाठी प्रत्येक पाऊल सावध रित्या टाकले.सुरुवातीपासूनच काँग्रेसचें महादेव पाटील यांनी बाजार समितीत झालेल्या भ्रष्टाचारावर रान उठवले होते.खासदार पुत्र प्रभाकर बाबा पाटील आणि आघाडीतील सर्वच घटकांनी सुरुवाती पासूनच प्रत्येक घडामोडी वर लक्ष ठेऊन जिंकण्याच्या दृष्टीने आक्रमक पने प्रचार यंत्रणा राबवली होती.सोसायटी गटात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या एक हाती वर्चस्वला हादरा देऊन निर्णायक मते आपल्याकडे वळवण्यात ते यशस्वी झाले;पण विजयाप्रत पोहचता आले नाही.परंतु एकहाती सत्तेची स्वप्ने बघणाऱ्या राष्ट्रवादी नेतृत्वाला विचार करायला लावणारा हा निकाल लागला.सोसायटी गटातून फुटलेली मते,आणि काठावर मिळालेला विजय हा राष्ट्रवादीला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे हे मात्र निश्चित. कारण राष्ट्रवादी नेतृत्वापासून दुरावलेला मतदार हा नेतृत्वाने त्याच्या प्रती असणारी निष्ठा व विश्वासार्हता गमावल्याचे संकेत देतो तर दुसऱ्या बाजूला प्रभाकर बाबांचे नेतृत्व मान्य असल्याचे सिद्ध करतो. एकूणच पूर्वीसारखाचं आबा- काकांचा काठावरचा आणि टोकाचा संघर्ष त्यांचे राजकीय वारसदार म्हणून दादा आणि बाबा यांच्यातून पाहायला मिळेल.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.