प्रतिष्ठा न्यूज

चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे बर्डविंग इको टुरिझम, डिझाईन आणि नेचर शॉप ची सुरुवात

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : 3 मार्च जागतिक वन्यजीव दिना निमित्त पर्यटन वाढीसाठी सह्याद्री व्याघ्र राखीव मधील चांदोली राष्ट्रीय उद्यान येथे वन्यजीव अभ्यासक प्रणव महाजन यांचे वतीने सोविनिर शॉप सुरू करण्यात आले आहे. सदर शॉप हे बर्डविंग इको टुरिझम, डिझाईन अँड नेचर शॉप नावाने जाधववाडी चेक नाका आणि वारणावती येथील वनविभाग ऑफिस समोर सुरू करण्यात आले आहे. देशातील महत्त्वाच्या व्याघ्र प्रकल्पामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा समावेश होतो. व्याघ्र प्रकल्पास अनेक देशी, विदेशी पर्यटक, पर्यावरण अभ्यासक, प्राणी मित्र, पक्षीमित्र भेट देत असतात. भेट देत असलेल्या पर्यटकांना व्याघ्र प्रकल्पाची आठवण असावी अशी एखादी वस्तू मिळावी यासाठी सोवेनीअर शॉप ची निर्मिती प्लॅनेट अर्थ फाउंडेशन मार्फत करण्यात आली आहे. सदर ठिकाणी पर्यटकांसाठी टी-शर्ट, कॅप , बर्ड हाऊस, बर्डफिडर, लेपल पिन
, ब्रोचर, पक्षी प्राणी यांची पुस्तके, तसेच इतर नैसर्गिक वस्तू ठेवण्यात आले आहेत. या बर्डविंग इकोटुरिझंम च्या माध्यमातून स्थानिक लोकांचे विविध उत्पादने पर्यटकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. नेचर शॉप मार्फत स्थानिकांनी तयार केलेले विविध प्रकारच्या वस्तू, पिके, हस्तकला, लाकडी वस्तू, मध, गूळ, औषधी वनस्पती, इ. उपलब्ध असणार आहेत. तसेच चांदोलीत येणाऱ्या पर्यटकांचे नियोजन देखील केले जाणार आहे. यामध्ये आलेल्या पर्यटकांसाठी पक्षी निरीक्षण, वनस्पती ओळख, जंगलातील विविध निसर्ग भ्रमंती मार्ग, वन्य प्राणी अभ्यास, शैक्षणिक सहल, इत्यादी उपक्रमांसाठी मदत केली जाणार आहे.
सदर बर्डविंग इकोटूरीझम, डिझाईन आणि नेचर शॉप या ठिकाणी येथे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक कोयना श्री. उत्तम सावंत सर, उपसंचालक चांदोली पाटील मॅडम, वनक्षेत्रपाल राक्षे,  वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, तसेच वनपाल , वनरक्षक इ.तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतीक पाटील दादा , विराज नाईक तसेच इतर मान्यवरांनी भेट दिली आणि या नावीन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.