प्रतिष्ठा न्यूज

विलिंग्डन महाविद्यालयातील खेळाडू प्रणव पाटील याची अखिल भारतीय अंतर विद्यापीठ जुदो स्पर्धेसाठी निवड

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : शिवराज कॉलेज गडहिंग्लज येथे झालेल्या आंतरविभागीय जुदो स्पर्धे मध्ये स्पर्धेमध्ये विलीग्डन महाविद्यालयातील खेळाडू प्रणव पाटील एम.ए. भाग १ याने ८१ किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवत लवली प्रोफेशनल विद्यापीठ पंजाब येथे होणाऱ्या अखिल भारतीय अंतर विद्यापीठ जुडो स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठ संघामध्ये त्याची निवड झाली. तसेच रेवती साळुंखे बी.एस.सी. भाग १ हिने ४८ किलो वजन गटांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला त्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भास्कर ताम्हणकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुरेश कुंभार रजिस्टर  हनमंत उपळावीकर उपस्थित होते सदर खेळाडूंना डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली विभागीय अध्यक्ष डॉ. विश्राम लोमटे, सदस्य रामकृष्ण पटवर्धन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.आर.ए.कुलकर्णी , उपप्राचार्य डॉ. एस.जी. कुलकर्णी जिमखाना समिती प्रमुख डॉक्टर राजू कांगणे यांनी प्रोत्साहन दिले तसेच शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गणेश सिंहासने सौ.योगिता परमने    अनिल आंबोळे यांनी मार्गदर्शन केले
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.