प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा योगासन निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : योगासन भारत व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत सांगली डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे जिल्हा स्तरीय निवड चाचणी स्पर्धा मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर सांगली मिरज  रोड येथे रविवार दिनांक २८ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा  ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर व रिदमिक  पेअर या ४ प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेत विविध वयोगटात सुमारे ९४ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक वयोगटातील पहिले ३ क्रमांक ट्रॅडिशनल  राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पाठवण्यात येतील. सब जुनिअर गट १०+ ते १४ (मुले व मुली ), जुनिअर गट  १४+ ते १८ (मुले व मुली ) यांची राज्यस्तरिय स्पर्धा १५ ते १७ ऑगस्ट २०२४ रोजी ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे तर  सिनिअर  गट १८+ ते २८ (मुले व मुली ) यांची राज्यस्तरिय स्पर्धा १८ ऑगस्ट २०२४ रोजी ध्रुव ग्लोबल स्कूल, संगमनेर येथे होईल.
जिल्हास्तरीय स्पर्धचे उदघाटन नाशिक डिस्ट्रिक्ट योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष  विवेक शेटे यांच्या हस्ते करण्यात आले ,  उपाध्यक्ष प्रज्ञा खोत.सचिव मोहन कवठेकर स्पर्धा प्रमुख शैलेश कदम, विक्रम कोरीच, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. प्रास्ताविक सचिव मोहन कवठेकर यांनी केले व योगासन स्पर्धेत पुढे कशा प्रकारे वाटचाल करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष  विवेक शेटे  यांनी योगाचे महत्व विशद केले. तसेच  शैलेश कदम  यांनी स्पर्धेविषयी सर्व माहिती  स्पर्धकांनी दिली. आभार  संतोष पोळ  यांनी मानले. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत सुमारे २० तांत्रिक अधिकारी व जज यांनी महत्वाची भूमिका पार पार पाडली.सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र तर प्रत्येक गटातील क्रमांक प्रथम क्रमांकाला  गोल्ड मेडल, द्वितीय क्रमांकाला सिल्वर मेडल व तृतीय क्रमांकाला ब्रॉझ मेडल व या सर्वाना विशेष प्रावीण्य प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. 35 वर्षावरील सर्व स्त्री व पुरुष गटातील प्रत्येक स्पर्धकांना गुलाबाचे फुल देऊन विशेष स्वागत करण्यात आले.
      या स्पर्धेसाठी मोहन कवठेकर, प्रज्ञा खोत , शैलेश कदम, अर्चना कवठेकर , संतोष पोळ,भक्ती करंदीकर, दीपक दुर्गाडे, श्रद्धा पाटील, हर्षद गाडगीळ, सुकन्या कुलकर्णी , अनिकेत म्हेत्रे, कुणाल शिंदे, रोशनी जाधव, प्रतिष्ठा माने,  पांडुरंग चव्हाण  या  संघटनेच्या जज व पदाधिकाऱ्यांनी स्पर्धेचे नीटनेटके आयोजन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.