प्रतिष्ठा न्यूज

मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षण मिळण्यासाठी बेमुदत आमरण उपोषणास बसणार : राज्य प्रवक्ता संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी शांततेत चाललेल्या आंदोलनास राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सूचनेनुसारच आंदोलनाकावर दडपशाही व दंडलशाही करून दांडक्याचा वापर करून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.परंतु हे आंदोलन नुसतं जालना पुरते मर्यादित न राहता पूर्ण महाराष्ट्रभर पसरले आहे त्यांचे एकच म्हणणं होतं की आम्हाला मराठा समाजाला आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठीआरक्षण द्या,परंतु आरक्षण देण्याऐवजी त्यांना लाठ्याने काठ्या ने जखमी करून उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्या आंदोलनास आमचा पाठिंबा दर्शवण्यासाठी दिनांक 7_9_ 2023 वार गुरुवार महात्मा गांधी पुतळ्याजवळ, स्टेशन चौक सांगली या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे तरी तमाम सांगली जिल्ह्यातील मराठा समाजातील व इतर बहुजन समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नेतेमंडळी यांनी त्या ठिकाणी पाठिंबा दर्शनासाठी यावे अशी विनंती मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.