प्रतिष्ठा न्यूज

आदर्श विनय मंदिर गोमटेशनगर कूपवाड या प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : लोकनायक शिक्षण मंडळाचे आदर्श विनय मंदिर गोमटेशनगर कूपवाड या प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योगपती राजू बावडेकर यांचे हस्ते झेंडा फड़कून मानवंदना देणेत आली. शाळेच्या मुलांनी राष्ट्रगीत व देशभक्ती गीत सादर केले.
शाळेचे मुख्याध्यापक हरिराम खबाले सर यांचे हस्ते उपस्थित पाहुणे यांचा थोडक्यात परिचय करुन देणेत आला. त्यांचे स्वागत व प्रस्ताविक झाले.
सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना संबोधित करताना राजू बावड़ेकर म्हणाले, प्रथम तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण सर्वजण एका खास दिवसाची आठवण ठेवण्यासाठी येथे जमलो आहोत. आजच्या या दिवशी म्हणजे सन 1950साली आपली भारतीय राज्यघटना लागु झाली आणि भारतीय प्रजासत्ताकची स्थापना झाली. भारतीय संविधान लागु झाल्यानंतर आपला भारत देश प्रजासत्ताक बनला. या दिवशी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आपण सर्व समान आहोत. एकाच देशाचे नागरिक आहोत याची आपली राज्यघटना आपल्याला आठवण करुन देते. आपण सर्वांनी लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वांनी आपल्या देशाला नव्या ऊँचीवर नेऊ.
यावेळी विक्रम जगताप सर, सागर खंडागळे सर, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.