प्रतिष्ठा न्यूज

सुरेखा शेख यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली :- सेवा, अधिकार, विधायक, रचनात्मक, संघर्ष आणि निर्माण हा व्यापक दृष्टिकोन ठेवून. अनेक वर्षे निराधार, बेघर, वंचित, उपेक्षित संकटग्रस्त महिला- बालक, मुली, देवदासी, वारंगणा, असाध्य रोगाने पीडित अशा समूह घटकांच्या मध्ये अधिकारांची जाणीव करून देणारे, सेवा, सुविधा सवलती कायदेशीर  सल्ला मार्गदर्शन करून अनेकांचे पुनर्वसन करून जीवनमान उंचावणारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा शाहीन शेख यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अन्वेषण ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार अनिता देशमुख होत्या.
       कोल्हापूर  राजश्री शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पुरस्कार गौरव समारंभामध्ये शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक डॉ. सुभाष सामंत यांनी केले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.