प्रतिष्ठा न्यूज

कोयना धरणातून विसर्ग वाढवला; कृष्णा नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांना सतर्क रहाण्याचे आवाहन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 2 : कृष्णा नदीची आयर्विन पूल येथील पाणी पातळी दि. 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता 39 फूट 9 इंच इतकी आहे. आज सकाळी 9 वाजल्यापासून कोयना धरणातून 10 हजार क्युसेक्स विसर्ग वाढविण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याव्दारे सातारा जिल्ह्याकरिता रेड व आँरेज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे सध्या नदीची पाणी पातळी कमी होत असली तरी धरण व मुक्त पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्याने, पाण्याचा येवा वाढल्यामुळे कोयना व इतर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीची आयर्विन पूल येथे पाणी पातळीमध्ये अंदाजे 2 ते 3 फुट वाढ होण्याची शक्यता आहे. मुक्तपाणलोट क्षेत्रातील पाऊस व धरणातील विसर्गवाढीमुळे पाणीपातळी मध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील ग्रामस्थ, शेतकरी यांनी सतर्क रहावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोयना धरणामधून 52 हजार 100, धोम धरणातून 7 हजार 856, कन्हेर धरणातून 4 हजार 844, धोम बलकवडी धरणातून 1 हजार 415, उरमोडी धरणातून 2 हजार 973, तारळी धरणातून 4 हजार 960 व वारणा धरणातून 11 हजार 532 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.

वेळोवेळी अद्ययावत माहितीचे निवेदन देण्यात येईल. अधिक माहितीसाठी सांगली पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षातील 0233-2301820, 2302925या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.