प्रतिष्ठा न्यूज

खाडे पब्लिक स्कूलच्या प्रांगणावर साकारले स्वातंत्र्यापूर्वीचे गाव

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज:  दास बहु उद्देशीय विश्वस्त संस्था संचलित मातोश्री तानुबाई दगडू खाडे पब्लिक स्कूल मालगाव येथे विद्यार्थ्यांना पूर्वीच्या काळी अस्तित्वात असणारी ग्राम व्यवस्था व बारा बलुतेदार पद्धती मुलांना समजावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पैसा हे विनिमयाचे साधन नसताना व्यवहार कसे व्हायचे याची प्रचिती मुलांना आली. बारा बलुतेदार म्हणजे कोण? त्यांची कार्ये, त्यांचे ग्राम व्यवस्थेतील महत्त्व याची माहिती मुलांना समजली. या ग्रामजीवन उपक्रमामुळे मुलांच्या व्यवहारी ज्ञानात भर पडली आहे. तसेच मुलांना त्यावेळी खेळत असलेले पारंपरिक खेळ व त्यामुळे होणाऱ्या शाररिक हालचाली, व्यायाम व त्याचे फायदे मुलांच्या लक्षात आले.
        या उपक्रमाअंतर्गत सर्व मुलांनी शिक्षकांच्या मदतीने पूर्वीच्या काळातील ग्राम जीवन व व्यवस्थेचा अभ्यास करून संपूर्ण गाव शाळेच्या प्रांगणात वसवले होते. यामध्ये वेशीवरील मारुती मंदिर पासून गावदेवी ची यात्रा, लमाण,डोंबारी, चांभार, परीट, शिंपी, भविष्य सांगणारे जोशी, लोहार, दगड काम करणारे पाथरवट पासून ते पाटलांच्या वाड्यापर्यंत सर्व ग्राम जीवन प्रतिकृती व त्यांचे व्यवसायाचे हुबेहूब अनुकरण करून उपस्थित सर्व पालकांचे व पाहुण्यांची मने जिंकली.
        या उपक्रमासाठी मुलांना संस्थेचे अध्यक्ष, कामगारमंत्री  तथा पालकमंत्री  डॉ. सुरेश भाऊ खाडे, संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, स्वाती खाडे, समन्वयक ज्योत्स्ना माने, मुख्याध्यापिका सुप्रिया पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.