प्रतिष्ठा न्यूज

धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे निर्माल्य संकलन उपक्रम ; तासगाव येथे श्री सदस्यांचा पुढाकार; आठ तासात 700 किलो निर्माल्य जमा

प्रतिष्ठा न्यूज
कवठे एकंद प्रतिनिधी : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांचे मार्फत महाराष्ट्रभर श्री गणेश गौरी विसर्जन निमित्त निर्माल्य संकलन करण्यात आले.
नदी प्रदूषण टाळण्यासाठी निर्मल्य संकलन उपक्रमामध्ये तासगाव बैठकीतील श्री सदस्यांच्या मार्फत केरळा नदीवरील तुरची पुल गौरी गणपती विसर्जन स्थळी निर्माल्य संकलन कक्ष उभारण्यात आला. तसेच नदीकाठ परिसरात विसर्जन स्थळी निर्माल्य संकलन करण्यात आले. या उपक्रमामध्ये दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत
प्रतिष्ठानचे सुमारे 30 हून अधिक सदस्य सहभागी होते.
या उपक्रमात सुमारे सातशे किलो निर्माल्य संकलित झाले. त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमासाठी तुरची ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सेवक, प्रतिष्ठित नागरिक यांचे सहकार्य लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.