प्रतिष्ठा न्यूज

दोन तपानंतर सुखदुःखासह आठवणींना उजाळा; तासगावच्या विद्यानिकेतनच्या 1998-99 बॅचचे गेट-टुगेदर

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव :1999 ची दहावीची परीक्षा दिल्यानंतर थेट 2023 मध्ये भेटलेल्या चेहऱ्यांना ओळखून त्या वेळच्या जुन्या आठवणी ताज्या करणे,गेल्या 23,24 वर्षातील सुखदुःख वाटून घेत तासगावच्या विद्यानिकेतनच्या 1998 99 च्या बॅचचें गेट-टुगेदर मोठ्या उत्साहात पार पडले.
एक दिवस स्वतःसाठी वेळ काढूया, आठवणींचा खजिना सोबत नेऊया म्हणत गेट-टुगेदर चा कार्यक्रम येथील शालिनी पॅलेस हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता.सकाळी दहा पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यात जे काळाच्या ओघात सोडून गेले त्यांना श्रद्धांजली वाहीली गेली आणी विविध स्थरावर आपली कामगीरी योग्य पद्धतीने बजावणारे आणी मोठमोठ्या पदावर आपली छाप टाकणारे ही अगदी लहाण होवून या गेट टू गेदरचा आनंद लुटताना दिसले.त्यानंतर उपस्थितानी आपली ओळख करून देत सध्या आपण काय करतो याची माहिती करून दिली.माहिती सांगण्यासाठी व्यासपीठावर गेलेल्याच्या बाकीच्यांच्या कडून जुन्या आठवणी ताज्या केल्या जात होत्या.अतिशय हास्य विनोदात तसेच भावनिक वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.
सोबतीला आर्केस्ट्रा सुर संगम च्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता त्यामुळे गेट-टुगेदर च्या कार्यक्रमाला चार चांद लागले.तेरे जैसा यार कहा पासून ते मै हु डॉन पर्यंत गाणी गाऊन अनेकांनी आपल्या अंगातील कलेला स्वतःच वाव मिळवून दिला.त्यानंतर झिंगाट च्या गाण्यावर सगळ्यांनीच धमाल मस्ती करत डान्स केला. त्यानंतर भोजन आणि आईस्क्रीम पार्टीने कार्यक्रमाची सांगता झाली
इथून पुढच्या काळात फॅमिली गेट-टुगेदर तसेच दरवर्षी भेटायचं, आणि एकमेकांच्या सुखदुःखात सर्वांनी एकत्रित एक कुटुंब म्हणून सहभागी व्हायचं अशा आणा भाका घेऊन कार्यक्रमाचा समारोप झाला.
या कार्यक्रमला अश्विनी पाटील,शंकर खरमाटे,योगेश शिंत्रे,संदीप सावंत,प्रमोद यलमार,दिपक पाटील,सुहास अमृतसागर,दादासो सावंत,अभिजीत माळी,पुष्कराज शिंदे,आनंदराव कळसे,विजय माळी, शितल शिवणकर,संजय राजमाने, सोमनाथ पैलवान,नितीन बाबर, संतोष माळी,सचिन माईनकर,सागर महिंद्रकर,श्री.दिनकर खरमाटे, श्री.जावेद नदाफ,श्री.शरद दौंड, श्री.संदीप खरमाटे,श्री.कृष्णा कदम, , सिमा खाडे,मनिषा यादव,दिपश्री पोरे – पेटकर,अनिता शिंदे,संगीता म्हेत्रे, यशोदा तोडकर,सुप्रिया भोसले आणि शिवाजी माळी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.