प्रतिष्ठा न्यूज

पालकमंत्री यांच्या हस्ते डॉ. आंबेडकर पुतळा ते मिरज – सांगली रस्त्याचे उद्घाटन ; पृथ्वीराज पाटील यांच्या कामाचे सुरेशभाऊ खाडेंकडून कौतुक

प्रतिष्ठा न्यूज
मिरज, प्रतिनिधी दि. २१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते मिरज – सांगली रोड या रस्त्याच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री तथा कामगार मंत्री ना. सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते व सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात पृथ्वीराज पाटील यांनी नगर विकास मधून दहा कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यातील दोन कोटींच्या निधीतून या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.

यावेळी ना. खाडे यांनी पृथ्वीराज पाटील यांच्या कामाचे कौतुक केले. पालकमंत्री म्हणून सर्वांना समान न्याय देतोय. आम्ही विकास कामात एकत्र आहोत, या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन हे उद्घाटन केले आहे, हे त्याचे प्रतीक आहे. कुपवाड येथेही समाज मंदिराचे भूमिपूजन मी आणि पृथ्वीराज बाबांनी एकत्रित काम केले आहे. मिरजेतील ड्रेनेजच्या कामाबाबत आयुक्तांशी चर्चा झाली असून अतिरिक्त निधी देऊन ते काम पूर्ण केले जाईल. सर्व नगरसेवकांना मी फंड दिला आहे, तसेच पुढील कामाकरता प्रस्ताव मागवले आहेत.

पृथ्वीराज पाटील म्हणाले, या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात हॉस्पीटल आहेत, त्यामुळे रुग्णांच्यासाठी व शैक्षणिक संकुले असल्यामुळे हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता, मिरज सांगली या शहरांना जोडणाराही हा रस्ता आहे, त्यामुळे वाहतुकीची सोय चांगली होणार आहे.

यावेळी मोहन व्हनखडे, माजी महापौर किशोर जामदार, विरोधी पक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादी गटनेते मैनुद्दिन बागवान, नगरसेवक गणेश माळी, आनंदा देवमाने, पांडुरंग कोरे, नगरसेविका सौ.संगीता खोत, सौ. गायत्री कल्लोळी, माजी नगसेवक विठ्ठल खोत, अल्लाउद्दीन काझी, गजेंद्र कल्लोळी, बाबासाहेब अळतेकर, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. प्रताप भोसले, डॉ. शरद देसाई, डॉ. राजेंद्र मेथे, सनी धोतरे, अय्युब निशानदार, सतीश अण्णा सावंत, विजय बसरगी, अशोकासिंग राजपूत, अरूण गवंडी, प्रशांत चव्हाण, अशोक पवार, कॉन्ट्रॅक्टर अभिशेख पाटील, बसगोंडा कबाडे, उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.