प्रतिष्ठा न्यूज

माता आणि माणुसकीच्या रक्षणासाठी पृथ्वीराजबाबा पाटील व फौंडेशन कायम धावून जातात : विजया पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२८: वासनांध नराधमांनी राज्यातील अनेक ठिकाणी महिला व आमच्या बहुजनांच्या लेकीवर अत्याचार केले. कायम माता आणि माणुसकीच्या रक्षणार्थ धावून जाणारे पृथ्वीराजबाबा पाटील आणि फौंडेशनला हा फार मोठा धक्का बसला आहे. आम्ही अशा दुर्दैवी घटनांचा जाहिर निषेध करतो. सांगलीत घडलेल्या घटनेचा तीव्र निषेध करुन नराधम आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. सांगलीच्या आमच्या लेकी या रणरागिणी आहेत. संकटात निर्भयपणे हल्ला परतवण्यासाठी सक्षम झाले पाहिजेत. सांगलीतील एकही महिला आणि आमच्या मुलींकडे वाकड्या नजरेने कोणी पहाणार नाही यासाठी नागरिकांनीही पुढे आलं पाहिजे. लैंगिक अत्याचार होत असताना केवळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. असे प्रतिपादन विजया पृथ्वीराज पाटील यांनी केले. संजयनगर येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती घेऊन पिडीत कुटुंबाला त्यांनी भेटून धीर दिला आणि परिसरातील महिला व नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या.

पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजया पाटील यांनी संजयनगर भागात भेट देऊन पिडीतांना धीर दिला. यावेळी त्यांनी फौंडेशनकडून आर्थिक मदतही दिली. पृथ्वीराजबाबा पाटील व विजयामाईंनी अत्याचाराविरुद्ध लढण्याची उर्जा दिली. आणि आर्थिक हातभारही लावला. आम्हाला त्यांच्या या मानवतावादी कार्यातून आईच्या वात्सल्याची अनुभूती लाभली असे सांगताच उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले.
यावेळी सरीता शेख, सुजाता पाटील, विक्रम शिंदे, खंडोबा मंदिराचे अध्यक्ष पापू भोसले, हनुमान मंदिराचे अध्यक्ष कृष्णा कांबळे व भागातील महिला उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.