प्रतिष्ठा न्यूज

प्रा. श्रीकृष्ण मोहिते राष्ट्रपिता जोतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली येथील भारती विद्यापीठाच्या डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयातील इंग्रजी विभागाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आणि भारती विद्यापीठाच्या ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे सचिव प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांना त्यांनी केलेल्या जलसंधारण, पाणलोट विकास, कृषी, पर्यावरण व प्रशिक्षण इ क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आणि विविध विषयावर कसदार लेखन केल्याबद्दल कराड येथील परिवर्तन फाउंडेशन कराड यांच्या वतीने प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांना राष्ट्रपिता जोतिबा फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदरचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण स्मृती सभागृह कराड येथे समाजभूषण आप्पासाहेब गायकवाड, उपविभागीय अधिकारी उत्तमराव दिघे इ. मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रा.श्रीकृष्ण मोहिते गेली अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभागी आहेत. यापूर्वी त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार व सामाजिक कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आदरणीय डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या कार्याचा वारसा घेऊन ते सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. या प्रसंगी प्रसंगी तहसीलदार विजय पवार, उद्योपती डॉ.मनोज पाटील,प्राचार्य डॉ. नायकवडी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सो मालनताई मोहिते, प्राचार्य विद्या मोरे ,मानवाधिकार संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष मा.राकेश कांबळे, मा.आप्पालाल इनामदार, मोहिते वडगांवचे आदर्श सरपंच विजय मोहिते, रामचंद्र मोहिते इत्यादी मान्यवर उपस्थित होते.प्रा. श्रीकृष्ण मोहिते यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मा.आम . डॉ. विश्वजीत कदम मा.आ. मोहनराव कदम(दादा) डॉ.शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. एम.एस. सगरे, डॉ.जितेश कदम, मा.दिग्विजय कदम , प्राचार्य डॉ,डी .जी.कणसे, प्राचार्य डॉ. व्ही. वाय.कदम, प्रा. संजय ठिगळे त्याचबरोबर मोहिते वडगांव येथील ग्रामस्थ त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.