प्रतिष्ठा न्यूज

मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील एक अविस्मरणीय अनुभव!!!

मराठा उद्योजक आणि मार्गदर्शन संस्थेच्या (मराठा उद्योजक कक्षाच्या) वार्षिक मिटींगसाठी आणि आई जिजाऊंच्या दर्शनाच्या ओढीने,आमच्या नाशिक टिमचा प्रवास मातृतीर्थ सिंदखेडराजाच्या दिशेने सुरू झाला.उगवत्या सूर्याच्या दिशेने होणारा तो समृद्धी महामार्गावरील प्रवास आम्हा सर्वांना एक अस्मरणीय अनुभव होता.इश्वेद बायोटेक कंपनीमध्ये आमचे सुंदर स्वागत करण्यात आले. आम्हाला फ्रेश होण्यासाठी सुसज्ज गेस्ट हाऊस ओपन करून देण्यात आले.आम्ही कंपनीच्या कॅम्पसमध्ये फेरफटका मारत असतांना इश्वेद बायोटेक चे फाऊंडर आणि ज्यांच्या व्हिजनमुळे “इश्वेद बायोटेकचा” कारभार 57 देशांपर्यंत पसरला असे शिवश्री संजय वायाळ सर यांच्याशी भेट झाली.अतिशय ग्राउंड टू अर्थ माणूस,कोणत्याही गोष्टीचा गर्व नाही अगदी जमिनीशी जुळलेला माणूस आणि मॅनेजमेंटची (MBA) अक्षरशः चालती बोलते विद्यापीठ त्यांच्याशी बोलतांना त्यांचे मायभूमी बद्दलचे प्रेम, त्यांच्या व्यावसायावरचे प्रेम आणि एकंदरच उद्योजकतेवर त्याचे प्रेम आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास ऐकुन खुप मोटिव्हेशन मिळाले.

थोड्याच वेळात आपले राज्य अध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह पाटील सरांचे आणि ईतर टीमचे आगमन झाले.त्यांनी आम्हा सर्वांशी संवाद साधत आमची विचारपूस केली आणि सोबतच सगळ्यांनी सुग्रास नाश्त्याचा आस्वाद घेतला.त्यावेळेस शिवश्री पाटील सरांनी आम्हाला बरेच मोलाचे सल्ले दिले. ज्यांचा आपल्या व्यवसायात तसेच आपल्या होऊ घातलेल्या अधिवेशनात चांगलाच फायदा होणार आहे.

त्यानंतर मीटिंगला सुरवात सगळ्यांच्या ओळखींनी झाली, मीटिंगला जळगाव, अमरावती,सांगली, वाशीम,अकोला,नागपुर, सोलापूर आदी जिल्हय़ात कार्यरत कार्यकारिणीचे मेंबर्स आलेले होते.

महाराष्ट्र राज्य थिंक टॅन्क कोअर कमिटी सदस्य शिवश्री प्रकाश औताडे सर यांनी आजच्या युगात आपल्या व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी याचे विस्तृत मार्गदर्शन केले तसेच जिजाऊ सुपर मार्केट ही संकल्पना कशा प्रकारे कार्यरत आहे ते सांगितले.ज्याचा नक्कीच आपल्याला आपल्या व्यवसायात फायदा होईल.

महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष शिवश्री जगदीप रणदिवे सरांनी ई- कॉमर्स चे महत्व नमुद केले तसेच आपल्या व्यावसायिकांनी ई- कॉमर्स कसे वापरावे या बद्दल माहिती दिली आणि आम्ही विचारलेल्या काही शंकांचे निरसन ही केले.

याच दरम्यान मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब,शिवश्री अर्जुनराव तनपुरे सर आणि शिवश्री मधुकर मेहेकरे सर यांचे आगमन झाले.

महाराष्ट्र राज्य समन्वयक शिवश्री तानाजीराजे जाधव यांनी मराठा उद्योग आणि व्यवसाय मार्गदर्शन संस्थेची आजवरची वाटचाल व कार्य याबद्दल माहिती दिली.

त्यानंतर आपण नाशिक मध्ये कशा पद्धतीने काम करतो व त्याचा आपला काय फायदा होतोय याची संक्षिप्त माहिती सगळ्यांसमोर सादर करायची संधी आपल्याला मिळाली आणि मी आपले नाशिक मॉडेल तेथे प्रेझेंट केले.

आपल्या संस्थेची वेबसाईट तयार करायचे काम शिवश्री रोहित जगताप सर हे करीत आहेत त्यांनी त्याबद्दल संक्षिप्त माहिती दिली.

त्यानंतर आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर सर तसेच शिवश्री अर्जुनराव तनपुरे सर यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले व पुढील कार्यासाठी सर्वांना पॉझिटिव्ह एनर्जी दिली.

त्यानंतर अध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह पाटील सरांनी एकंदरीत आपले संस्थेचे कार्य व यापुढील वाटचाल याबद्दल दिशादर्शन केले. आपल्या नाशिक मध्ये चालू असलेल्या कामाचे विशेष कौतुक केले आणि 5 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योजक अधिवेशन आपल्या नाशिकमध्ये करायचे जबाबदारी आपल्या टीमवर देण्यात आली.त्यांनी सदर अधिवेशनासाठी राज्य कार्यकारी टीम व पूर्ण राज्यातील इतर जिल्ह्यातील टीम हे सर्व आपल्याला पूर्णपणे मदत करतील याची ग्वाही दिली.त्यांनी आपल्यावर दाखवल्या विश्वासाबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

सभा झाल्यानंतर आम्ही सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला आणि राजमाता जिजाऊंना वंदन करण्यासाठी राजवाड्यावरती गेलो. स्वराज्याला दोन दोन छत्रपती देऊन,घडवून मराठ्यांची आणि महाराष्ट्राची अस्मिता जागविणाऱ्या राजमातांचे दर्शन घेतल्यानंतर ऊर भरून आला.राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवानिमित्त तेथे होत असलेल्या विविध कार्यक्रमांचा आनंद घेतला आणि नेटवर्किंग सुद्धा खूप छान झाली. रात्री झोपण्यासाठी निशुल्क राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती,त्या छोट्याशा सिंदखेडराजा गावाने, लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठा बांधवांना सामावून घेतले आणि सर्वांची राहण्या खाण्याची सोय केली.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच बारा तारखेला सकाळी चार वाजेपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते लाखोंच्या संख्येने लोक येत होते मात्र तिथं वरती राजमाता जिजाऊ चे दर्शन घेत होते आणि समोरच मैदानावरती असलेल्या साडेपाचशे विविध स्टॉल मधून विविध विषयांवरचे ज्ञान – पुस्तक रूपाने मिळवत होते.

दुपारी बारा वाजेच्या सुमारास आपले प्रदेशाध्यक्ष शिवश्री राजेंद्रसिंह पाटील सर, शिवश्री संजय वायाळ सर,शिवश्री प्रकाश अवताडे सर,शिवश्री अर्जुनराव तनपुरे सर, शिवश्री विजय घोगरे सर, शिवश्री मेहेकरे सर व इतर सर्व मान्यवर यांचे बरोबर जॉईंट मीटिंग करण्यात आली व आपल्या नाशिकच्या अधिवेशनाची रूपरेषा कशी असेल ते ठरविण्यात आले आणि सर्वांनीच नाशिकच्या अधिवेशनासाठी सर्व प्रकारची मदत करण्याची ग्वाही दिली.

संध्याकाळी आलेल्या लाखोंच्या जनसमुदायाला मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर सर, जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य अध्यक्ष शिवमती माधुरी भदाणे मॅडम,शिवश्री गंगाधर बनबरे सर व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. आपल्यातील प्रत्येकाने मातृतीर्थ सिंदखेडराजा ची वारी दरवर्षी केलीच पाहिजे असा हा सगळा अनुभव होता.

आपले महाराष्ट्र राज्य समन्वयक सुधाकर पाटील सर आणि शिवश्री तानाजी राजे जाधव सर यांनी सर्वांना एकत्र आणण्यासाठी खूप मेहनत घेतली होती त्यांचे खूप खूप धन्यवाद!
आपल्या नाशिक टीम कडून मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष शिवश्री दीपक भदाणे सर,आपले उपाध्यक्ष शिवश्री माधव मुधाळे सर,शिवश्री सुनील कोइनकर सर आणि प्रमोद अहिरराव सर आदी उपस्थित होते. सर्वांनी खास करुन शिवश्री दिपक भदाणे सरांनी आपण करत असलेल्या प्रेझेंटेशनसाठी, अधिवेशनाबद्दल डिस्कशन करीता व इतर गोष्टींसाठी प्रचंड मदत केली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद.

आई जिजाऊंच्या दर्शनाने मिळालेली एनर्जी आणि हिंमत, वरिष्ठांचे लाभलेले आशीर्वाद आणि मार्गदर्शन,ईतर जिल्हय़ातील कार्यरत कार्यकारिणी आणि आपल्या जिल्ह्यातील सगळ्या बांधवांच्या साथीने आपली टिम हे अधिवेशनाचे शिवधनुष्य पेलू शकेल हा विश्वास निर्माण झाला. मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहेकरे सर यांनी उद्योजक कक्षाचे कार्य व उत्कृष्ट सुरू असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंग पाटील यांचे कौतुक केले.मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष प्रा.अर्जुनराव तनपुरे यांनी मराठा सेवा संघ उद्योजक कक्षाचे नाशिक जिल्ह्याचे कौतुक करत नाशिक जिल्ह्यावर त्यांचा दौरा असतांना त्यांनी स्थानिक परिस्थिती पाहता अधिवेशनाचे नाशिक हे ठिकाण निश्चित केले व बैठकीत नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या कार्पोरेट बैठका सर्वांसाठी आशादायी असल्याचे सांगितले व अधिवेशनासाठी राज्यभरातून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजी. पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या अधिवेशनात खूप मोठे अपेक्षा आहेत.अधिवेशन अतिशय कार्पोरेट झाले पाहिजे,अधिवेशनात ग्राउंड टच ते आंतरराष्ट्रीय व्यापार यातील संधी भारतीय उद्योजकांना व्यावसायिकांना येणाऱ्या आगामी काळातील संधी, अडचणी,उपाय यावर सखोल चर्चा केली व अधिवेशन यशस्वी होण्यासाठी नाशिक टीमला शुभेच्छा दिल्या.

संपूर्ण ट्रीप खऱ्या अर्थाने खूप काही देऊन गेली!!! आपली संपूर्ण टीम आली असती तर सगळ्या ट्रिप ची मजाच काही और असती,ही मात्र हुरहुर लागुन गेली!!!
सिंदखेडराजा येथील बैठकीत राजू लोहे,प्रशांत ढोरे,प्रकाश अवताडे, भगवान शिंदे,सुधाकर पाटील,वीरेंद्र पाटील, दीपक चौधरी,संजय पन्नासे,अतुल देशमुख, गणेश पडवळ,ज्ञानेश्वर कोठोरे,प्रमोद अहिरराव, अविनाश घुलेकर,नितीन उबरे,रोहित जगताप, निलेश ठाकरे,सारंग राऊत,अजय तोडकर, सुनील कदम,कुलदीप काटकर,शेखर ठाकरे, बी.के.नागणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांनी एकमेकांशी संवाद साधत बैठक यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला.

मित्रांनो नाशिक मधील सर्वात चांगला कार्पोरेट हॉल असलेला कालिदास कला मंदिर नाट्यगृह आपण ५ मार्च साठी बुक केलेले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अधिवेशनाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे.विविध सत्राच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी राज्यभरातून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्यासह प्रशासकीय, उद्योजक क्षेत्रातले नामवंत धुरंदर नाशिक जिल्ह्यात दाखल होणार आहेत. राज्यातील काही नामवंत उद्योजक व्यावसायिकांचा यावेळी सन्मान केला जाणार आहे. ज्यांनी आपला व्यवसाय शून्यातून यशस्वी केला अशा उद्योजकांच्या यावेळी मुलाखती घेतल्या जाणार आहेत.आपला व्यवसाय उद्योगधंदा वाढवण्यासाठी व हा व्यवसाय उद्योगधंदा राज्यभर जाण्यासाठी आपल्याला खूप मोठी संधी आहे. अधिवेशनामुळे राज्यभरातील लोक एकत्र येतात,विविध भागातील उद्योगधंद्यांची आपल्याला माहिती मिळते,जेणेकरून ही पर्वणी आपल्या नाशिककरांसाठी मिळाली आहे या संधीच सोने नाशिककर उद्योजक व व्यावसायिक तसेच मराठा उद्योजक कक्षाचे सर्व पदाधिकारी करतील व या अधिवेशनाच्या शिवधनुष्याच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचे नाव उंचावतील हीच आपल्यासाठी सर्वांना शुभेच्छा.

शिवश्री विशाल देसले
नाशिक जिल्हाध्यक्ष,
मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था.
(मराठा उद्योजक कक्ष)

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.