प्रतिष्ठा न्यूज

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने वडघर जि. रायगड येथे लेखन कौशल्य कार्यशाळा आणि कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचे वतीने वडघर जि. रायगड येथे लेखन कौशल्य कार्यशाळा आणि कार्यकर्ता सन्मान सोहळा शनिवार दि. १४ आणि १५ सप्टेंबर २०२४ रोजी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक, वडघर, जि. रायगड येथे आयोजित केला आहे अशी माहिती संपादक मंडळ सदस्य राजीव देशपांडे, राहुल थोरात, मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण यांनी दिली.

शनिवार १४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राज्यस्तरीय कार्यकर्ता लेखन कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटन साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या हस्ते होईल. यावेळी ते ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या लेखन कौशल्यातून आपण काय शिकायचे ?’ यावर बोलतील.

त्यांनर अंनिसचे कार्यकर्ते आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ हमीद दाभोलकर हे ‘चळवळ आणि लेखन’ यावर मार्गदर्शन करतील. इंडियन एक्सप्रेस मुंबईचे पत्रकार आलोक देशपांडे हे ‘बातमी लेखन’ यावर मार्गदर्शन करतील.

दुपारच्या सत्रात प्रसिद्ध बालसाहित्य राजीव तांबे हे ‘चला लिहूया’ या विषयावर दोन तासाची विशेष कार्यशाळा घेतील. ही कार्यशाळा अंनिसचे कार्यकर्ते लेखक दिवंगत डॉ. शंतनु अभ्यंकर यांना समर्पित केली आहे.

संध्याकाळी पाच वाजता पु. ल. देशपांडे लिखित मंगेश सातपुते दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णी निर्मित ‘मॅड सखाराम’ हे नाटक सादर होईल. नाटकानंतर प्रेक्षकांशी संवाद होईल.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी १० वा. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वाढीसाठी काम करणाऱ्या राज्यभरातील कार्यकर्त्यांचा सन्मान प्रसिद्ध कवयित्री नीरजा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायगड जिल्ह्यातील अंनिसचे जेष्ठ कार्यकर्ते भाऊ सावंत असतील. तर प्रमुख उपस्थिती म्हणून बालसाहित्य राजीव तांबे असतील.

कार्यक्रमाचे स्थानिक संयोजन रायगड जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते मोहन भोईर, संदेश गायकवाड, मीना मोरे, अमित निंबाळकर, विवेक सुभेकर करीत आहेत.

या कार्यक्रमांस उपस्थित राहणाऱ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था अंनिसच्या वतीने केली आहे. त्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून त्यासाठी सुहास ९९७०१७४६२८, संजय ९८३४१५८२०८ या नंबरवर संपर्क करावा. तरी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सांगली जिल्हाध्यक्ष व्ही.वाय आबा पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.संजय निटवे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.