प्रतिष्ठा न्यूज

सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी श्रीमती करुना सॅमसन व सांगली जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्षपदी सौ. स्वप्ना तानाजी बोराडे यांची नियुक्ती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वसंतदादा भवन सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अंतर्गत सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष पदी श्रीमती. करुना सॅमसन व सांगली जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस अध्यक्ष पदी सौ.स्वप्ना तानाजी बोराडे यांची निवड करण्यात आली. ही निवड महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजाभाभी प्रकाशबापू पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन संपन्न झाला. यावेळी सांगली शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती.जयश्री वहिनी पाटील व सौ पूजा विशालदादा पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सौ.मालनताई मोहिते, माधवनगर लोकनियुक्त सरपंच अंजू तोरो, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे, युथ काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष गीतांजली पाटील, आशा पाटील, पुजा पाटील, आरती गुरव तसेच इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.