प्रतिष्ठा न्यूज

जतमध्ये तुकाराम बाबांच्या हस्ते ५१ गणेश मंडळांना श्री ची मोफत मूर्ती; एक गाव एक गणपती गावाला प्राधान्य ; ५१ हजार टी शर्ट चे होणार वाटप

प्रतिष्ठा न्यूज
जत/प्रतिनिधी : श्री संत गाडगेबाबा, श्री संत बागडेबाबा यांच्या विचारांचा सामाजिक वारसा जपणारे श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावांना श्री च्या मुर्त्या मोफत भेट देण्यात आल्या. राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे परमशिष्य वैराग्य संपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य मागील १४ वर्षांपासून एक गाव एक गणपती राबविणाऱ्या गणेश मंडळाला श्री ची मूर्ती भेट देणाऱ्या हभप तुकाराम बाबा महाराज यांनी यावर्षी जत तालुक्यातील ५१ हुन अधिक गणेश मंडळाना श्री ची मूर्ती भेट दिली आहे. यात प्रामुख्याने तालुक्यात एक गाव एक गणपती मोहीम राबविणाऱ्या गणेश मंडळाला गावाला प्राधान्य देण्यात आले आहे. या गावाला श्री ची मूर्ती, ११ हजार रुपये रोख, श्री संत सयाजी बागडेबाबा सन्मान पुरस्कार-2024 देवून गौरविण्यात येणार आहे. एक गाव एक गणपती बरोबर व टी शर्ट तसेच अन्य सहकार्य करण्यात येणार आहे.
संख येथील बाबा आश्रमात श्री च्या मूर्ती गणेश मंडळाना देण्यात आल्या. पाच फुटाहून अधिक उंची असलेल्या मुर्त्या मंडळाला देण्यात आल्या. हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते श्री च्या मुर्त्या देण्यात आल्या. यावेळी राज्याचे माजी मंत्री आ. जयंत पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे, पुणे येथील मानव मित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख तथा मानवाधिकार संघटनेचे संजय धुमाळ आदी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.