प्रतिष्ठा न्यूज

राऊतखेडा खेडेगावातील माधव चा महाराष्ट्रात डंका:पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाल्याने कौतुकाचा वर्षाव

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : ‘सालगड्या’च्या मुलाची जिद्द, शिक्षणाची ओढ यांमुळे पोलिस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. त्याच्या नावाचा महाराष्ट्र राज्यात नावलौकीक ( डंका) झाला असून त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. तसेच
राऊतखेडा गावात आनंदी आनंद झाला आहे.
जिद्द,चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर
खेड्यात राहून सुद्धा अधिकारी होण शक्य आहे. त्यासाठी परिस्थिती ऐवजी परिश्रम म्हत्वाचे आहे.याचे प्रत्यंतर राऊतखेडा येथील माधव गर्जे या तरुणाने स्वता:च्या बळावर एमपीएससी परिक्षेतून पोलिस उपनिरीक्षक झाल्याने शेतात राबणाऱ्या बापाच्या घामाचं सोनं पोराने पिएसआय होऊन पुर्ण केल्याने सर्वस्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
कंधार तालुक्यातील राऊतखेडा येथील लोकडू गर्जे हे गावातच एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करतात. घरची शेती कमी असल्यामुळे लहानपणापासून लोकांच्या शेतीत काम करून आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण व संस्कार दिले त्यांचा वडील मुलगा माधव यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.शाळा ( मराठी माध्यम) राऊतखेडा येथे तर माध्यमिक शिक्षण
कमळेवाडी तालुका मुखेड येथील वस्तीगृहात दहावीपर्यंत शिक्षण मराठी माध्यमातून पूर्ण केले. शिक्षणाची ओढ असल्याने माधव गर्जे यांनी दहावीनंतर पॉलिटेक्निक कॉलेज छत्रपती संभाजी नगर येथे तर अभियांत्रिकीचे शिक्षण संगमनेर येथे झाले. आयुष्यात काही तरी करून वडिलांचे ऋण फेडावे अशी जिद्द माधव च्या मनात होती.
त्याच्या घराकडील परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे त्याने पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळेल ते काम करून अभ्यास करत असे. २०२० मध्ये पी एस आय पदाचे सर्व टप्पे यशस्वी रित्या पार करून आज पीएसआय झालो या माझ्या यशात आई वडील, माझे गुरूजी, भाऊ बहीण भाऊजी व मित्राचा फार मोठा वाटा आहे. माझ्या यशाचे श्रेय मी त्यांना देतो सर्वात मोठा सिंहाचा वाटा माझ्या वडिलांचा आहे. असे त्यांनी प्रतिष्ठा न्युज प्रतिनिधी शी बोलताना सांगितले.
माधव गावाकडे आला तरी वडिलांना मदत व्हावी यासाठी तो शेतात सुद्धा काम करत होता वडीलाचे काबाड कष्ट डोळ्यासमोर ठेवून माधवने आपल्या वडिलांना उतार वयात तरी चांगला आधार होणार आहे.
आपल्या आयुष्यात चांगले दिवस यावे यासाठी दिवस-रात्र मेहनत करून कधी उपाशीपोटी झोपून यशाला गौसणी घातली आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदांवर नियुक्ती झाली आहे त्याच्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.
त्यांच्या या यशाबद्दल पत्रकार राजेश पावडे, प्रतिष्ठा न्युज चे वसंत सिरसाठ, राजू पाटील , सी.ए.संतोष कुलकर्णी, यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.