प्रतिष्ठा न्यूज

कौलगेचा कृषी सहाय्यक खाजगी सावकार दत्तात्रय औताडे याला अटक करून तात्काळ निलंबनाच्या कारवाईसाठी मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : कौलगे येथील खाजगी सावकार कृषी सहाय्यक दत्तात्रय भगवान औताडे यांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे,याप्रकरणी महेश सुभाष पाटील राहणार खुजगाव यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे परंतु संशयित कृषी सहाय्यक खाजगी सावकारी करणारा औताडेला पोलिसांकडून अद्याप अटक करण्यात आलेली नाही,सावकारी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कृषी सहायक औताडेच्या खाजगी सावकारीची व्याप्ती मोठी असल्याचे बोलले जात आहे,गाव तालुक्यातील अनेक मोठे द्राक्ष शेतकरी,व्यापारी,कॉन्ट्रॅक्टर, स्टोन क्रशर व सर्वसामान्य शेतमजूर यांना लाखो रुपये त्याने सावकारकी स्वरूपात व्याजाने दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी मध्ये औताडे कृषी सहायक म्हणून कार्यरत असताना शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून ही माया त्याने जमवलेली आहे. जवळपास १ नव्हे तर तब्बल १० कोटी रुपये त्याने खाजगी सावकारकी स्वरूपात वाटप केलेले आहे,पैशाच्या जोरावर सर्वसामान्य लोकांना दमदाटी करणे धमकावणे त्यामुळे याच्या आधी उघडपणे कोणीही तक्रार दिली नव्हती परंतु आता औताडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणात खाजगी सावकारकीच मोठे रॅकेट उघडकिस येणार असून त्याला तात्काळ अटक करून,एका कृषी सहाय्यकाकडे एवढी संपत्ती कुठून आली याची चौकशी करून त्याची स्थावर मालमत्ता जप्त करावी व त्याला निलंबित करून या खाजगी सावकारकीची ED (Directorate of Enforcement) अंमलबजावणी संचालय मार्फत चौकशी करण्यात यावी असे निवेदन आज मनसे जिल्हा संघटक अमोल काळे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले असून औताडे याच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.