प्रतिष्ठा न्यूज

श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालयातील एनसीसी विभागास माजी विद्यार्थिनी संघटना संचालक मंडळाकडून रायफली भेट

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयातील एनसीसी विभागासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी संघटनेच्या संचालक मंडळाकडून सरावासाठी रायफलींची मदत करण्यात आली.

खरंतर कन्या महाविद्यालय हे इचलकरंजी आणि परिसरातील एकमेव कन्या महाविद्यालय आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी कामगार वर्गातील विद्यार्थिनींना विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेता यावी, यासाठी हे महाविद्यालय सुरू केले आणि या महाविद्यालयात एनसीसी हा विभाग खास मुलींसाठी सुरू करण्यात आला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व रायफली एनसीसी विभाग प्रमुख कॅप्टन प्रमिला सुर्वे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आल्या.
त्याचबरोबर उद्योगपती श्री.सुभाष बलवान यांनी महाविद्यालयास पाच डमी रायफल भेट दिल्या,

*महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब दुधाळे,कॅप्टन प्रमिला सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या एनसीसी कॅडेट तयार होत आहेत आणि विविध क्षेत्रात आपले नाव कमवत आहेत.*

यावेळी माजी विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्ष स्मिता बुगड, सेक्रेटरी शिप्ला गांजवे, कल्पना माळी, सुनीता गडविर,शर्मिला मोरे, शहीन मकानदार सहिदा कच्छी,शकुंतला पाटील,श्वेता जाधव जयश्री दडपे,स्नेहा परीट, अनिता जाधव आणि प्रो.डॉ.त्रिशला कदम, प्रा. संगीता पाटील आणि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व आजी माजी एनसीसी कॅडेट, गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.