प्रतिष्ठा न्यूज

मिरजेमध्ये तयार गांजा मालासह आरोपी सह जेरबंद;स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कामगिरी

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरजेमध्ये तयार गांजा मालासह आरोपी सह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली शाखेस यश आले. चेतन कुमार चौगुले, वय ३० वर्षे, रा. आशा टॉकीजवळ, मिरज, जि. सांगली. असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून ६० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
*गुन्ह्याची थोडक्यात हकीकत*
श्री. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी त्यांचे अधिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणारे इसमांचेवर कारवाई करणेसाठी स्थापन करण्यात आलेले आहे. त्या अनुशंगाने दि. ३०/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांचे पथकामधील पोहेकों/अमोल ऐदाळे यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की, एक इसम गांजा विक्री करीता मिरज पंढरपूर रोडवरील एस. एस. कॉलेज जवळ, मिरज येथे मोटार सायकलवरून येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, मिरज पंढरपूर रोडवरील सिव्हील हॉस्पीटल जवळील वंजाळे यांचे पेट्रोल पंपाचे समोरील रोडवर वॉच करीत थांबले असता एक इसम बातमीप्रमाणे मोटार सायकलवरून मिरज पंढरपूर रोडवरील एस. एस. कॉलेज व वंजाळे पेट्रोल पंपाचे दरम्यान असले बंद टपरी जवळ येवून थांबला त्याचे पाठीला काळया रंगाची सॅक अडकवलेली दिसली. तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव चेतन कुमार चौगुले, वय ३० वर्षे, रा. आशा टॉकीजवळ, मिरज, जि. सांगली असे असलेचे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी त्यास मिळाले बातमीची हकीकत सांगुन त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचे पाठीवर अडकवलेल्या सॅकमध्ये हिरवट काळपट रंगाचा तयार गांजा माल मिळून आला. त्यास सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सागितले की, सदरचा गांजा माल हा त्याने त्याचा मित्र आयुब पिरजादे, रा फुलेवाडी, कोल्हापूर याचेकडुन खरेदी करून तो जादा दराने विक्री करणेकरीता घेवून आला असल्याची कबूली दिली. लागलीच सदर आरोपी व गांजा माल सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त करून मिरज शहर पोलीस ठाणेस याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा,
सपोफी / अनिल ऐनापुरे, पोहेकों / अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, बाबासाहेब माने पोना / अनंत कुडाळकर, पोशि / सोमनाथ पतंगे, रोहन घस्ते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.