प्रतिष्ठा न्यूज

डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवर ; नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी : मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज
मुंबई प्रतिनिधी : स्वतंत्र बाण्यानं काम करणारी डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडावर असून देशात मोठ्या संख्येनं असलेली युट्यूब चॅनल्स सरकारच्या विरोधात खंबीरपणे भूमिका घेत असल्याने ही नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय. असे मत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले आहे.

एस.एम. देशमुख यांनी पुढे म्हटले आहे की, भांडवलदारी माध्यम व्यवस्थेला टक्कर देत देशात अनेक युट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट्स उत्तम पत्रकारिता करीत आहेत.. देशातील अनेक बडे पत्रकार, संपादक नव्या डिजिटल व्यवस्थेशी जोडले गेलेले आहेत.. सरकारचं दडपण झुगारत, स्वतंत्र बाण्यानं काम करणारी ही डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडारवर आहेत.. आयटी कायद्याचं कलम 69 A चं उल्लंघन केल्याचं कारण देत सरकारनं गेल्या दोन वर्षात तब्बल 150 युट्यूब चॅनल्स बंद केली आहेत.. या चॅनेल्सवरून देशविरोधी मजकूर प्रसारित होत होता असं सरकार म्हणतंय.. युट्यूब पत्रकारांना हा आरोप मान्य नाही.. सरकार विरोधी बातम्या दिल्याने ही चॅनल्स बंद केली गेली असल्याचं युट्यूब चॅनल्स चे संपादक सांगतात, असेही एस.एम. देशमुख यांनी नमुद केले. देशात मोठ्या संख्येनं असलेली युट्यूब चॅनल्स सरकारच्या विरोधात खंबीरपणे भूमिका घेत असल्याने ही नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी ठरतेय..

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.