प्रतिष्ठा न्यूज

लोहा तालुका काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते उद्धव ढेपे यांची निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील मारतळा येथील काँग्रेसचे युवा कार्यकर्ते उध्दव पाटील ढेपे यांची लोहा तालुका काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षपदी निवडून करण्यात आली असून दि.12 जून 2023 रोज सोमवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.
यावेळी आमदार- अमर राजूरकर, माजी आमदार- ओमप्रकाश पोकर्णा, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष- गोविंदराव नागेलीकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष- शिवाजी धर्माधिकारी, तालुकाध्यक्ष- शरद पवार, गुलाब पाटील जोमेगावकर, रामराव पाटील ढेपे, आदींच्या उपस्थितत निवड करण्यात आली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवडीबद्दल त्यांचे उमरा सर्कल मधील काँग्रेसचे कार्यकर्ते भास्कर पाटील, माधव कदम, सतीश ढाले, उत्तमराव वडवळे, निरंजन कौडगावकर, वसंत शिंदे, यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.