प्रतिष्ठा न्यूज

अफजलखानाचा व्हायरस काही लोकांच्या डोक्यात आहे आणि तो जर बाहेर काढायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली वाघ नखे महाराष्ट्रात आणावी लागतील : मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्या भोवती वनखात्याच्या जागेवर अफजल खान भक्तांनी केलेलं अनधिकृत बांधकाम बुलडोजर लावून जमीनदोस्त करायचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री मा. ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीने भगवा फेटा, शाल, गदा, हार व अफजलखान वधाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना मा. ना. श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणाले की, प्रतापगडाप्रमाणे राज्यातील गडांवर झालेले अनाधिकृत बांधकामे अतिक्रमण हटवून गडांना गतवैभव प्राप्त करून देणार, विशाळगडावरील 168 खोल्यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी वनविभागाकडून 1.17 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. अफजलखानाचा व्हायरस काही लोकांच्या डोक्यात आहे आणि तो जर बाहेर काढायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढलेली वाघ नखे महाराष्ट्रात आणावी लागतील. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडाच्या थडग्याभोवती झालेल्या अतिक्रमणाविरोधात नितीन शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला.

यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, अफजलखान वधाच्या जागेभोवती करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हायकोर्टाने तीन वेळा ते अनाधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देऊन सुद्धा तत्कालीन राज्यकर्त्यांनी मतांसाठी आदेश दिले नाहीत परंतु मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे आम्ही ही मागणी केल्यानंतर त्यांनी एका क्षणाचाही विलंब न करता तात्काळ थडग्या भोवतीचे संपूर्ण अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश देऊन तिथे एक वीटही शिल्लक ठेवू नका असे आदेश दिले.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक करताना भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस ॲड. स्वाती शिंदे यांनी श्री शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलनाच्या वतीने केलेल्या 23 वर्षांच्या लढ्याचा इतिहास सांगितला.

यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री सुरेशभाऊ खाडे, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, नीताताई केळकर, पैलवान पृथ्वीराज पवार, हनुमंत पवार, विष्णुपंत पाटील, संजय जाधव, सिद्धार्थ गाडगीळ, ओंकार शुक्ल, श्रीकांत शिंदे, अविनाश मोहिते, गीतांजली ढोपे-पाटील, संगीताताई खोत, उर्मिला बेलवलकर, अप्सरा वायदंडे, सुनीता इनामदार, अभिमन्यू भोसले, शिवाजी पाटील, गजानन मोरे, रोहित पाटील, सागर सुतार, पैलवान प्रदीप निकम, आशिष साळुंखे, अवधूत जाधव, महादेव चिकोडे, आनंदा चिकोडे, रणजीत शिकलगार, विश्वजीत पाटील, राम काळे, नवनाथ खिलारे यांच्यासह भाजपा, शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रताप भूमि मुक्त आंदोलन, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती, सकल हिंदू समाज सांगली जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसह शिवभक्त बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.