प्रतिष्ठा न्यूज

काजल कांबळेने फडकावलाा डांगया सुळक्यावर तिरंगा :टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या सोबत पुन्हा एका कठीण सुळक्यावर चढाई

प्रतिष्ठा न्यूज
नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील डांग्या सुळका सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळे यांनी यशस्वीपणे सर केला.  कठीण श्रेणीतील हा सुळका सर करणारी महाराष्ट्रातील पहिलीच दिव्यांग महिला ठरली आहे.

मनाचा थरकाप आणि काळजाची धडधड वाढवणारे नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीचे रूप म्हणजे येथील सुळके. असाच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील दहेगाव जवळील सह्याद्री पर्वत रांगेतील कठीण श्रेणीतील डांग्या सुळका. हा सुळका गिर्यारोहकांसाठी नेहमीच एक आव्हान समजले जाते. टीम पॉईंट ब्रेक ॲडवेंचर्स नेहमीच अशा आव्हानात्मक मोहिमा घेते व त्या सफल करते. यावेळेस 18 डिसेंबर रोजी या संस्थेने डांग्या सुळका आरोहन मोहीम आयोजित केली होती. यामध्ये सांगलीच्या दिव्यांग काजल कांबळेनी सहभाग घेतला होता. 18 डिसेंबर ला सकाळी सप्रेवाडी गावातून या मोहिमेला सुरुवात झाली. जवळपास 200 फुट उंच असलेल्या त्या सुळक्याच्या पायथ्याशी पोचल्यावर 10.30 वाजता सर्वांनी एका वेळी एक याप्रमाणे सुळक्यावर चढाई करण्यास सुरुवात केली.
सुळक्याच्या माथ्यावर पोचल्यावर गिर्यारोकांनी तिरंगा फडकवत भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, अशा घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.

हा सुळका सर करण्यासाठी काजलला टीम पॉईंट ब्रेक अॅडवेंचर्स चे जॉकी साळुंखे, चेतन शिंदे, डॉ. समीर भिसे, राजश्री चौधरी, भरत, ज्ञानू यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या मोहिमेत काजल खांबळे सह शिवाजी जाधव, अथर्व शेटे, विजय मेटकरी, सुहास कातळकर, डॉ. समीर भिसे, आदी गिर्यारोहकांचा सहभाग होता.
याआधीही काजलने कळसुबाई शिखरासह अनेक गड किल्ले सर केले आहेत. वजीर, हिरकणी कडा, मोरोशीचा भैरवगड सारखे कठीण सुळके गड सर केले आहेत. दिव्यांग मुलींमध्ये असे कठीण सुळके सर करणारी महाराष्ट्रातील पहिलीच ठरली आहे.. आणि यापुढेही तीला असे सुळके गड सर करण्याची इच्छा आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.