प्रतिष्ठा न्यूज

सांगली मार्केट यार्ड मध्ये लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्याचे लोकनेते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांची 103 जयंती सांगली मार्केट यार्ड मध्ये राजाराम बापू सहकारी बँकेमध्ये सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळेला मार्केट यार्ड शाखेचे बँक मॅनेजर माननीय अभिजीत यादव, विनोद पाटील, सीमा पाटील ,विकास पाटील, रोहन बसुगडे, सचिन सपकाळ, संदीप पाटील, दीपक कुंभार व मार्केट यार्ड यातील व्यापारी नागरिक उपस्थित होते या वेळेला प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष व माजी मंत्री माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजारामबापू सहकारी बँकेचा जिल्ह्यात व महाराष्ट्रात नावलौकिक आहे व त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे बँक प्रगतीपथावर आहे व भविष्यकाळात ही सर्वसामान्यांच्या मदतीला येणारी हे बँक आहे व अशीच प्रगती होत जाईल अशी आशा आहे असे वक्तव्य या वेळेला केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.