प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल मध्ये पदग्रहण सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संयोगिता पाटील केंब्रीज स्कूल मध्ये पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला. या समारंभाला प्रमुख पाहुणे, म्हणून मिरजेतील प्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉ. महेश गुजर उपस्थित होते. पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, रोपटे व अल्पावकाश पुस्तक देऊन स्वागत व सत्कार शाळेचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांनी केला.
तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना पदे वितरण करण्यात आली. यामध्ये उमर पाटील, राहील मुजावर, स्वप्न कुरणे, वरद मगदूम, अमृता मालवे, प्रार्थना पटेल, सुकन्या चौगुले, कृष्णा यादव, विधी शेट्टी, सायुज मोहिते, अनुष्का भंडारी, आदित्य कमलाकर, केतकी सकपाळ, फैज अरभवी, उमलवारा शरीकमसलत, जय यादव, हर्षिका कांबळे, रोहित देवमाने, मोहीन बुजरूक, विनायक राजमाने, समृद्धी साळुंखे, अभिषेक जाधव, एँशलीन जोशी, केतन थैल, साक्षी परचुरे या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पदे वितरण करण्यात आली. सर्वांना संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील सर संस्थेचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर महेश गुजर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अनुभवातून प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले ते म्हणाले, एक खरा नायक तोच जो सर्व अडथळ्यांचा सामना करून पार पाडू शकतो आणि ज्याला एकत्र काम करण्याचे महत्त्व माहित असते. मराठीत एक म्हण आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते. मुलांच्यात संयम, शिस्त व विश्वास असला पाहिजे वेळेचे महत्व त्यांनी जाणले पाहिजे. त्याचबरोबर जाता जाता त्यांनी दहावीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करण्याचे जाहीर केले.
त्याचबरोबर अधिक्षिका ख्रिस्टीना मॅडम यांनी विद्याथ्यांमधील क्षमता, प्राविण्य आणि कोणतेही काम किती जबाबदारीने पार पाडता यावर तुमचे व्यक्तिमत्व अवलंबून असते सर्वजण काही नेते बनू शकत नाही.
स्कूलचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांनी जबाबदारी चोख पार पाडणारा हा एक नायक असतो. खरा नायक जो भेदभाव करत नाही, जो आपल्या साथीदारांना प्रोत्साहन देतो.आपल्या स्कूलच्या यशस्वी निकालाचे खरे नायक हे आपले गुरु व कष्टाळू वृत्तीचे विद्यार्थी आहेत. स्वतः स्वयंशस्तीचे पालन करून इतरांना स्वयंशिस्त लावणे हे त्यांचे काम आहे अशा वाक्यातून सुंदर असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका श्रीदेवी कुल्लोळी, इस्टेट मॅनेजर विलास शेवाळे, समन्वयिका विद्या घुगरे सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम क्रीडाशिक्षक दीपक शेलार यांच्या निर्देशनाखाली झाला, सूत्रसंचालन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.