प्रतिष्ठा न्यूज

तासगावचे सुपुत्र निसार मुल्ला यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गेल्या अनेक वर्षापासून आरोग्य क्षेत्रात शासनाच्या विविध योजना अंतर्गत साडे हजारच्या वर रुग्णांची मोफत सेवा शासकीय योजनेतून करून,माणुसकी हीच एक जात असे मानून जातपात धर्म विरहित असे अनेक उपक्रम राबवत असलेले गोरगरिबांचे आरोग्यदूत निसार मुल्ला यांना कोल्हापूर येथे लोकराजा राजश्री शाहू गौरव राज्यस्तरीय पुरस्कार 2023 हा नुकताच प्रदान करण्यात आला.त्यांचा हा 24 वा पुरस्कार आहे.आसाम गुवाहाटीचे समाजसेवक व साहित्यिक पंकज लोशन बैष्य,सहाय्यक पोलिस आयुक्त दीपक आर्वे,मराठी चित्रपट दिग्दर्शक दीपक साळुंखे रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अध्यक्ष प्रा. एम बी शेख सर, व अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  प्रदान करण्यात आला.पुरस्कार मिळाल्या नंतर निसार मुल्ला म्हणाले माणसाने माणसाची सेवा करणे हीच खरी ईश्वर सेवा आहे आपल्या हातून परमेश्वर पुण्याईचे काम करून घेत आहे हे मी माझे भाग्य मानतो,व यामध्येच खरे समाधान आहे.पुरस्कार मिळाल्या निसार मुल्ला यांच्यावर विविध स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.