प्रतिष्ठा न्यूज

जत तालुक्यातील भयावह दुष्काळकडे शासन, प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष, रखडलेली म्हैसाळ योजना, रेंगाळलेली विस्तारित म्हैसाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले लाक्षणिक आंदोलन

प्रतिष्ठा न्यूज
जत/प्रतिनिधी : जत तालुक्यातील भयावह दुष्काळकडे शासन, प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष, रखडलेली म्हैसाळ योजना, रेंगाळलेली विस्तारित म्हैसाळ योजनेकडे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरुवारी जत तहसिल कार्यालयासमोर चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने एक दिवस लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. तुकाराम बाबांच्या आंदोलनाने जतकरांचे लक्ष वेधून घेतले.
आंदोलकांच्या मागण्या मान्य न झाल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू, वेळप्रसंगी येणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी दिला.

जत तालुक्यात भयावह दुष्काळी परिस्थिती आहे तात्काळ दुष्काळ निवारण्याच्या उपाययोजना करा, म्हैसाळचे पाणी जत तालुक्यात प्रथम टंचाईटून सोडण्यात आले मात्र नंतर जे पाणी सोडण्यात आले त्याची पाणीपट्टी वसुली करून पाणी सोडले जात आहे. शेतकऱ्यांकडून वसूल केलेली पाणीपट्टी परत करा, म्हैसाळ योजनेतून जत तालुक्यातील तलाव किमान ५० टक्के भरा, म्हैसाळ योजनेचे माडग्याळसह अन्य भागात रखडलेले काम तात्काळ पूर्ण करून तेथे पाणी सोडा, विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाचा बोलबाला झाला पण प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. टेंडर निघाले असल्याचे सांगितले जाते पण अद्याप त्याचा पत्ता नाही. ही योजना तात्काळ मार्गी लावा, खरीप व रब्बी हंगाम वाया गेला आहे तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, फळबागांचे नुकसान झाले आहे त्यासही नुकसान भरपाई द्यावी, शासनाने मंडळ निहाय दुष्काळ जाहीर केला आहे तसे न करता संपूर्ण जत दुष्काळी तालुका दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या सवलती द्या, जत तालुक्यात मागेल तेथे, टँकर, चारा डेपो, चारा छावणी सुरू करा, दुष्काळ त्यात अवकाळी पावसाने फळबागा व रब्बी हंगामात (म्हैसाळच्या पाण्यावर) जि ज्वारी व अन्य पिकाची पेरणी केली होती त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करा, अवकाळी पावसाने जे नुकसान झाले त्याचे पंचनामे करताना फक्त फळबागांचे पंचनामे करण्यात आले आहेत. उर्वरित पिकांचे पंचनामे आदेश असूनही करण्यात आलेले नाहीत तेव्हा दोषींवर कारवाई करा या मागण्यांसाठी तुकाराम बाबा यांनी लाक्षणिक आंदोलन केले.

तुकाराम बाबांच्या आंदोलनाला जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मन्सूर खतीब, रासपचे तालुकाध्यक्ष बंडू डोंबाळे, भूषण काळगी, चरमगौडा पाटील, अमीन सर, मोहनराव गायकवाड, किसन टेंगले, सागर शिनगारे, शिवानंद हाक्के, तम्मा कुलाळ, आनंदराव पाटील, शफीक इनामदार, शिवानंद मोरडी, रुपेश पिसाळ, रमेश देवर्षी, लक्ष्मण पुजारी,संभाजी टेंगले, नसीर मुल्ला,विक्रम पुजारी, हनुमंत पुजारी, पांडुरंग पुजारी, संगप्पा पुजारी, मदगौंडा बिरादार, काशिनाथ मैत्री, प्रकाश चनगौंडा, सलीम गवंडी, महातेश स्वामी, गंगय्या स्वामी, बसवराज बिरादार, समाधान माने, तानाजी व्हनमाने, विनोद शेळके, तुकाराम सुतार यांच्यासह तालुक्यातील विविध गावातून आलेल्या विविध सामाजिक , राजकीय संघटनेनी तुकाराम बाबांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.

★ बाबांचे उपोषण; दादांनी मांडली अधिवेशनात व्यथा
जत तहसिल कार्यालयासमोर हभप तुकाराम बाबा महाराज यांचे लाक्षणिक आंदोलन सुरू होते त्याचवेळी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आ. विक्रमसिंह सावंत यांनी जतचा पाणीप्रश्न उपस्थित करत तुकाराम बाबांचे पाण्यासाठी जतमध्ये आंदोलन सुरू असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत जत पूर्व भागातील ६५ गावाच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित करत न्याय देण्याची मागणी केली.

जिवंत ठेवून मारण्याचा शासनाचा डाव- तुकाराम बाबा
वर्षानुवर्षे जत तालुका दुष्काळात होरपळत आहे. २०१९ ला संख ते मुंबई मंत्रालयापर्यत पायी दिंडी काढण्यानंतत आम्हाला लेखी कळविण्यात आले की जतला देण्यास पाणीच शिल्लक नाही. आजही म्हैसाळचे काम पूर्ण झालेले नाही. जत पूर्व भागाचा पाणीप्रश्न कायम आहे. मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी विस्तारित योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली, दोन हजार कोटी योजनेला मिळालेचे जतकरांना सांगण्यात आले पण अद्याप त्याचा पत्ता नाही. खोटी आश्वासने दिली जात आहे. जिवंत ठेवून काहीही न देता कोरड घशाला पाडून जतकरांना मारण्याचा शासनाचा डाव असल्याची खरमरीत टिका करत तुकाराम बाबा यांनी पाणी द्या अन्यथा यापुढे कालव्यात बसून आंदोलन करू, येणाऱ्या सर्व निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.