प्रतिष्ठा न्यूज

टॅंगसूडो राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिरजेतील खाडे इंग्लिश स्कूल चे वर्चस्व…

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
मिरज : येथील सुखनिवास सभागृहात टॅंगसूडो या खेळ प्रकाराच्या राष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी पाच राज्यातून साधारण २०० ते २५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, चंदीगड व राजस्थान या राज्यांचा सहभाग होता. या स्पर्धा अमर बनसोडे यांनी टॅंगसूडो फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने घेतल्या होत्या.
या स्पर्धेत मातोश्री तानुबाई दगडू खाडे इंग्लिश स्कूल मिरज या स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ११ सुवर्ण, ११ रौप्य तर १८ कास्य पदकांची कमाई करत चॅम्पियन ट्रॉफीचे मानकरी ठरले. या उत्कृष्ठ कामगिरीसाठी क्रिडा शिक्षक स्टीफन काकी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच सर्व यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांना संस्थेच्या संचालिका सुमनताई खाडे, सुशांत खाडे, कार्यकारी अधिकारी स्वाती खाडे, मुख्याध्यापिका संगीता पाटील यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे पालकांकडून व मिरज परिसरात कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.