प्रतिष्ठा न्यूज

ʼकर्मवीरांच्या विचारांचे वारसदार होऊया : प्रा. विठ्ठल मोहिते; कर्मवीर विद्यालयात कर्मवीर जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज
म्हैसाळ दि.२७. “पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य एव्हरेस्टसारखे उत्तुंग आहे. बहुजनांचे दुःख ,दैन्य ,दारिद्र्य , जातीयता, विषमता, अंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी शिक्षण हेच एकमेव साधन आहे, हे त्यांनी जाणले होते.हे ओळखूनच रयतमाऊली लक्ष्मीबाई व कर्मवीर अण्णांनी आयुष्यभर केलेले कष्ट, त्याग, समर्पण, तळमळ ,निष्ठा, जिद्द ही पराकोटीची होती. स्वावलंबन, स्वाभिमान, ‘कमवा व शिका’ याचे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. हा मंत्र जागतिक विद्यापीठांमध्येसुद्धा आज रुजतो आहे. मन, मनगट, मेंदू सशक्त करून आपण सारे कर्मवीरांच्या विचारांचे वारसदार होऊया.” असे प्रतिपादन मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. विठ्ठल मोहिते यांनी कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हैसाळ येथे कर्मवीर जयंती सोहळ्याप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मा. पुष्पराज केदारराव शिंदे हे होते.

मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सी.डी.कदम यांनी केले. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. विद्यालयात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व विविध स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक मा.भरतेश कबुरे यांचेकडून विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले .कार्यक्रमात चि. समर्थ जाधव, कु. श्रद्धा नरूटे व प्रा. एस. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री. जावळे एस.डी.व चव्हाण एस.बी.यांनी केले तर आभार पर्यवेक्षक एस. डी. लादे यांनी मांनले. यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य श्री. पांडुरंग घोरपडे ,सौ आशाताई मराठे, तानाजी जाधव ,श्री.डी.आर. शिंदे, उद्योजक भरतेश कुबेर ,शिक्षक प्रतिनिधी संजय दबडे, शिक्षक-सेवक वृंद पालक व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.