प्रतिष्ठा न्यूज

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस दि 25 रोजी नांदेड दौऱ्यावर

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड : राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचा दि. २५ जून रविवार रोजी अबचलनगर नांदेड दौरा नियोजित असून या दौऱ्या अंतर्गत “शासन आपल्या दारी ” या कार्यक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना जन सामन्यापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने ते सर्व उपस्थितांना सभेच्या माध्यमातून संबोधीत करणार आहेत.

यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा नांदेड यांच्यामार्फत सभेच्या ठिकाणी उपस्थीतांचे आरोग्य तपासणी करण्यासाठी महाआरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थितांचे उच्च रक्तदाब, मधुमेह, मौखिक आरोग्य तपासणी, स्त्री रोग तपासणी, नेत्ररोग तपासणी, मानसिक आरोग्य तपासणी व प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी आत्महत्या संदर्भात समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच थायरॉईड व एचबीए ९ या सारख्या आवश्यक ते रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत. याचबरोबर कार्यक्रम स्थळी उपस्थित जन सामान्यांचे आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून योजने अंतर्गत लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्ड हे मोफत तयार करून देण्यात येणार आहेत. आयुष्यमान भारत हे कार्ड तयार करून घेण्यासाठी लाभाथ्यांनी पी. एम. कार्ड किंवा रेशन कार्ड, आधार कार्ड, लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन यावा. वरील आरोग्य विषयक योजनांचा गोर-गरीब रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सकांनी केले आहे.
दरम्यान कृषी मंत्री अब्दुल सत्तार, खा.हेमंत पाटील, खा. प्रतापराव चिखलीकर, आ.बालाजीराव कल्याणकर, शिवसेना जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांनी सभास्थाळाची पाहणी केली असून या सभेचे नियोजन करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.