प्रतिष्ठा न्यूज

भुईबावडा घाटात पडझड सुरूच; पावसाचा जोर वाढल्यास दरड कोसळण्याची भीती

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात व घाट माथ्यावर तालुक्यात सलग ४/५ दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरडी कोसळणे, घरांची पडझड या गोष्टी पावसाच्या अतिवृष्टीमुळे होऊ शकतात. याची खबरदारी म्हणून प्रशासनाने आदेश काढून सावधगिरी बाळगण्याची आव्हान केले आहे.
गुरूवारी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने भुईबावडा घाटात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. दगड, गोटे रस्त्यावर आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान गुरूवारी सकाळी सा. बां. चे कर्मचारी अमोल पाटील, राजा कोळेकर यांनी घाटात झालेली पडझड हटवून रस्ता वाहतूकीस पूर्ववत केला आहे.
तालुक्यात गुरूवारी पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून सुमारे ४ कि. मी. अंतरावर मोठ्या प्रमाणात पडझड झाली. दगड, गोटे रस्त्यावर आल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता. दरम्यान गुरूवारी सकाळी सार्वजनिक बांधकामचे कर्मचारी अमोल पाटील, राजा कोळेकर यांनी रस्त्यावर झालेली पडझड हटवून रस्ता वाहतूकीस पूर्ववत केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.