प्रतिष्ठा न्यूज

‘नाती वांझ होताना” कवितासंग्रहास दोन पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना” या कवितासंग्रहास नुकतेच दोन पुरस्कार जाहीर झाले.यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद,दामाजीनगर शाखेचा मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती पुरस्कार मिळाल्याचे परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी जाहीर केले. डाॕ.दत्ता सरगर यांच्या अध्यक्षतेखाली रेखा जडे ,भारती धनवे,प्रा.विश्वनाथ ढेपे व सचिन गालफांडे या तज्ञ निवड समितीने ‘नाती वांझ होताना’ या कवितासंग्रहाची उत्कृष्ठ कवितासंग्रह म्हणून निवड केली .मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
नायगाव,जिल्हा नांदेड येथील प्रतिष्ठेचा ‘केवळबाई मिरेवाड साहित्य पुरस्कारही ‘नाती वांझ होताना’ या कवितासंग्रहास जाहीर झाला आहे.हा पुरस्कार कै. केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो.संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे.डाॕ.अशोक कौतिक कोळी व पांडुरंग पुठ्ठेवाड या तज्ञ कमिटीने या पुरस्कारांची निवड केली .रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लवकरच दोन्ही पुरस्कारांचे वितरण आयोजित कार्यक्रमांमध्ये करण्यात येईल,असे आयोजकांनी कळवले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.