प्रतिष्ठा न्यूज

तासगाव बाजार समिती संचालकाचीच द्राक्ष व्यापाऱ्याकडून फसवणूक… सर्वसामान्य शेतकऱ्यांना समिती काय न्याय देणार?

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव बाजार समितीचे विद्यमान संचालक,शेतकरी अंकुश सदाशिव माळी यांची द्राक्ष व्यापारी सलीम सरदार सय्यद सध्या रा.विटा या व्यापाऱ्याने 9 लाख 23 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची तासगाव पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.वास्तविक बऱ्याच शेतमालाच्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीचे नियंत्रण असते.तासगाव बाजार समितीच्या विद्यमान संचालकाचिच द्राक्ष व्यापारी सय्यद याने फसवणूक केल्याने,संचालकच फसवले गेल्याने तेच सुरक्षित नसतील तर बाजार समिती सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय न्याय देणार असा प्रश्न शेतकऱ्यातून विचारला जात आहे.फिर्यादी माळी यांच्या बागेतील द्राक्षे माळी यांनी व्यापारी सलीम सय्यद याला दि.21 फेब्रुवारी 2023 ला विक्री केली होती.सय्यद याने फिर्यादी माळी यांच्या कडून 180 रुपये 4 किलो दराने 5128 पेटी द्राक्षे खरेदी केली.गेले वर्षभर सलीम हा पैसे देण्यासाठी टाळाटाळ करत होता. त्यामुळे त्याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी सलीम याच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.