प्रतिष्ठा न्यूज

मॉर्निग वॉककरीता जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चेन स्नॅचींग करणारे रेकॉर्डवरील ३ सराईत आरोपी जेरबंद; ८ गुन्हे उघड; सात लाख सत्तर हजार रपयांचा मुद्देमाल हस्तगत

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मॉर्निग वॉककरीता जाणाऱ्या महिलांच्या गळयातील चेन स्नॅचींग करणारे रेकॉर्डवरील ३ सराईत आरोपी जेरबंद; ८ गुन्हे उघड; सात लाख सत्तर हजार रपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सांगली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. सुधाकर अशोक मोहिते, वय ३५ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली, भास्कर ऊर्फ संभाजी सांवत, वय २९ वर्षे, रा. कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली, कादर शरीफ काजी, वय २४ वर्षे, रा. अंबक, ता. कडेगाव, जि. सांगली. अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, गुन्हयाची थोडक्यात हकीकत
मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक कुमार पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन चेन स्नॅचींग करणा-या संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.

त्या अनुशंगाने दि. ०६/०१/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों/ अरुण पाटील आणि पोशि सुरज थोरात यांना त्यांचे बातमीदाराकडुन, रेकॉर्डवरील आरोपी नामे १) सुधाकर अशोक मोहिते, रा. कोतीज २) भास्कर ऊर्फ संभाजी सांवत, रा. कोतीज आणि ३) कादर शरीफ काजी, रा. अंबक हे चेन स्नॅचींग करून मिळालेले दागिने विक्री करणेकरिता मोटार सायकलवरुन ताकारी ते कराड जाणाऱ्या रोडवरील किल्ले मच्छिद्रच्या खिंडीत येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.

नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे, ताकारी ते कराड जाणाऱ्या रोडवरील किल्ले मच्छिद्रच्या खिंड परिसरात निगराणी केली असता, तिन इमस रोड कडेला मोटार सायकलवर थांबल्याचे दिसले. त्यांचा बातमीप्रमाणे संशय आलेने सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता तिनही इसमांना ताब्यात घेवून त्यांचे नांव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे १) सुधाकर अशोक मोहिते, वय ३५ वर्षे, रा. पाण्याचे टाकीजवळ, कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली. २) भास्कर ऊर्फ संभाजी सांवत, वय २९ वर्षे, रा. कोतीज, ता. कडेगाव, जि. सांगली. ३) कादर शरीफ काजी, वय २४ वर्षे, रा. अंबक, ता. कडेगाव, जि. सांगली अशी असल्याचे सांगितले. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याचे अंगझडतीचा उददेश कळवून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, सुधाकर मोहिते याचे पॅन्टचे उजव्या खिशात सोन्याचे दागिने व मोटार सायकल मिळून आली. तसेच भास्कर सावंत आणि कादर काजी यांचेकडे प्रत्येकी एक मोटार सायकल मिळून आली. सुधाकर मोहिते याचेकडे मिळाले सोन्याच्या दागिन्यांबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता सुधाकर मोहिते यांने सागितले की, सदरचे सोने हे तो व त्यांचे साथीदार यांचेसोबत सदर मोटार सायकलवरून वेळोवेळी इस्लामपुर, कराड, कुंडल, तासगाव येथे सकाळी चालायला येणारे महिलांचे गळयातील सोन्याचे दागिने हिसडा मारून चोरी केलेले दागिने असल्याची कबूली दिली.

सदर बाबत इस्लामपुर, तासगाव, कुंडल आणि सातारा जिल्हयातील कराड पोलीस ठाणेचे क्राईम अभिलेख तपासला असता, चेन स्नॅचिंग जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेल्या मोटार सायकली पुढील तपास कामी सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचासमक्ष जप्त केल्या. आरोपी क्रं. १ व २ हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर सांगली, सातारा, मुंबई तसेच कर्नाटक राज्यात चेन स्नॅचीग, जबरी चोरीचे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी इस्लामपुर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास इस्लामपुर पोलीस ठाणे करीत आहेत.
. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार, स्था.गु. अ. शाखा, पोहेकों/ अरुण पाटील, कुबेर खोत, दिपक गायकवाड, पोना/ प्रकाश पाटील, पोशि / सुरज थोरात, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, रोहन घस्ते, पोना/ कॅप्टन गुंडवाडे, स्वप्निल नायकुडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.