प्रतिष्ठा न्यूज

आमदार बाबर यांच्याकडून विसापूर सर्कल विकास कामासाठी ८३.८५ कोटीचा निधी

प्रतिष्ठा न्यूज / सौरभ निकम 
निंबळक : खानापूर आटपाडी आणि विसापूर विधानसभा मतदार संघातील विसापूर सर्कल मधील गावांच्या विविध विकास कामासाठी आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून ८३.८५कोटीचा निधी मंजूर केल्याने मतदार संघात भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे.
       विसापूर सर्कलसाठी आमदार अनिल बाबर यांच्या माध्यमातून किंदरवाडी पेड, मांजर्डे दत्तनगर, विसापूर लिंब, विसापूर राजापूर, शिरगाव ठोबरे वस्ती,या रस्त्यांना प्रत्येकी ५० लक्ष आणि मांजर्डे गौरगाव वळणरस्ता, कचरेवाडी तामखडी,निंबळक पंचक्रोशी हायस्कूल, बोरगाव प्राथमिक मार्ग, बोरगाव पंचक्रोशी हायस्कूल, हातणोली मंडले वस्ती, हातनूर ग्रामीण मार्ग रस्त्यांना प्रत्येकी ३० लक्ष, निधी मंजूर केल्याने विसापूर सर्कल मध्ये फिलगुड वातावरण तयार झाले आहे.
      निंबळक आणि बोरगाव येथील पालकांच्या हायस्कूल रस्त्याच्या मागणीस योग्य न्याय मिळाल्याने पालकातून समाधान व्यक्त होत आहे. त्याचबरोबर निंबळक जिल्हा परिषदेच्या शाळेसाठी शौचालय आणि कंपाउंडसाठी जवळपास ३२  लाखाचा निधी मंजूर केल्याची माहिती माजी ग्रामपंचायत सदस्य पुण्यवान पाटील आणि माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.