प्रतिष्ठा न्यूज

पर्यटकांना साद घालतोय फेसाळणारा ‘ बावेलीचा नयनरम्य धबधबा

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : प्रती महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावड्यात आणखी एक नवीन आविष्कार. बावेली (ता. गगनबावडा )येथील २२० फुटावरून कोसळणारा पांढऱ्या रंगाशी स्पर्धा करणारा, फेसाळणारा नयनरम्य’ धबधबा.’ पर्वणी ठरू लागल्याने पर्यटकांची पावले तिकडे वळू लागली आहेत.
बावेली हे गाव गगनबावड्या पासून वीस किलोमीटरवर असून, प्रसिद्ध मोर्जाई पठार पर्यटनस्थळा अवघ्या पासून दहा किलोमीटरवर आहे. बावेली गावाच्या धनगर वाड्या पासून एक किलोमीटर गेल्यानंतर हा सुंदर नयनरम्य धबधबा पाहावयास मिळतो. तिथेच उंचच्या ऐतिहासिक उंच ‘ किल चा’ डोंगर आहे, तिथून दुर्बिणद्वारे कोल्हापूर शहर सुद्धा न्याहाळता येते. जवळच काटे हवालदार यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई केली ती खिंड आहे.तिथूनच जवळच छत्रपती शाहू महाराज शिकारीसाठी जायचे ते ठिकाण व महालक्ष्मी मंदिर आहे. तिथे आजही अवशेष व खुणा पाहायला मिळतात.
एक दिवसीय सहलीमध्ये ही सर्व स्थळे पर्यटकांना पर्वणीच ठरणार आहेत .हा फेसाळणारा नयनरम्य धबधबा गगनबावडयाच्या पर्यटन क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा असलेला हा धबधबा पर्यटकांना आनंद लुटण्यासाठी साद घालत आहे.
स्थानिक इतिहास प्रेमी, समाजसेवक राहुल कांबळे यांच्याशी संपर्क साधल्यास आपला पर्यटन आनंद द्विगुणित होईल.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.