प्रतिष्ठा न्यूज

राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या बेघरांच्या समस्या व उपाय यावरील चर्चासत्रात सांगलीच्या बेघरांचा मसीहा मुस्तफाची वर्णी

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : रस्त्यावरील निराधारांना माणूस म्हणून सन्माननीय जीवन जगण्यासाठी मदत करण्यासाठी आव्हाने आणि उपाय या विषयावर म्हापुसा गोवा येथे ११ मे २०२३ ते १३ मे २०२३ पर्यंत राष्ट्रीय परिषदेचे आयोजन जीवन आनंद संस्था व एसईएस सोसायटीज यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीदोरा काक्युलो कॉलेज ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट स्टडीज, मापुसा गोवा येथे केले आहे. यासाठी सांगलीचा बेघरांचा मसीहा मुस्तफा मुजावर याची निवड झाली आहे.


संपूर्ण भारतातील रस्त्यावरील निराधारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि लोकांना एकत्र आणणे, या विषयावर काम करणाऱ्या संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि समविचारी लोक, संस्था, संघटना, महामंडळे आणि देणगीदार, सरकार यांना एकत्र आणणे हा या परिषदेचा उद्देश आहे. नियोजित राष्ट्रीय परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र येत, सहभागी भारतातील रस्त्यांवरील निराधार वंचितांच्या समस्या आणि त्यांना आधार देण्यासाठी अवलंबलेल्या विविध पद्धतींबद्दल एकमेकांशी चर्चा करतील. रस्त्यावरील निराधारांच्या जीवनातील समस्या, आव्हाने आणि उपाय ते एकमेकांकडून समजून घेतील अशी माहिती परिषदेचे समन्वयक आणि सचिव, जीवन आनंद संस्था संदिप परब यांनी दिली आहे.
या राष्ट्रीय पातळीवरील चर्चसत्रात भारतातून ३९ लोकांची निवड झाली आहे. त्यात सांगलीतून मुस्तफा मुजावर यांची निवड झाली. यासाठी पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे, माननीय आयुक्त सुनील पवार, उपायुक्त स्मृती पाटील व घरच्यांनी साथ दिली म्हणून आज बेघर लोकांसाठी काम करत असल्याचे मुस्तफा यांनी सांगितले. सध्या सांगली मिरज कुपवाड महापालिका संचलित दीनदयाल अंत्योदय योजनेच्या अंतर्गत सावली बेघर निवारा केंद्र हे इन्साफ फाउंडेशन मार्फत अध्यक्ष मुस्तफा मुजावर चालवत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.