प्रतिष्ठा न्यूज

संपूर्ण महारष्ट्रात धुमाकूळ घातलेल्या ‘सर्जा’ चित्रपटातील कलाकार येणार आज सांगलीकरांच्या भेटीला

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : सांगलीच्या अमीत पाटील या युवकाने निर्माण केलेला सर्जा हा चित्रपट सध्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे. जिगरी दोस्तीची आणि रांगड्या प्रेमाची धगधगती कहाणी असलेल्या या चित्रपटातील कलाकारांची मोठी क्रेझ तरुणाईत तयार झाली आहे. आज रविवार दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता एस.एफ. सी. मेघा मॉल येथे या चित्रपटातील सर्व कलाकार सांगलीकरांच्या भेटीला येणार आहेत.
अनिल नगरकर, रोहित चव्हाण, तुषार नागरगोजे, ऐश्वर्या भालेराव, आकाश पेटकर, ज्योति शेतसंधी, जगन्नाथ घाडगे, विष्णू केदार, प्रशांत पिसे, बालकलाकार गौरी खंडाळे, कुणाल गायकवाड, सानिया मुलानी या कलाकारांच्या भूमिका आहेत. अतिशय ताकदीने त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. हे कलाकार आज सांगलीकरांच्या भेटीला येत आहेत.
  राजवर्धन फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या ‘सर्जा’ची निर्मिती अमित जयपाल पाटील यांनी केली असून, रमेश रंगराव लाड आणि अभयसिंह माणिकराव हांडे पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. संगीतप्रधान ‘सर्जा’ चित्रपटाचं दिग्दर्शन धनंजय मनोहर खंडाळे यांनी केलं आहे. सुमधूर पार्श्वसंगीत, श्रवणीय गीत-संगीत, अर्थपूर्ण संवाद, नयनरम्य लोकेशन्स, सहजसुंदर अभिनय आणि सुरेख दिग्दर्शना पहायला मिळते. यातील ‘जीव तुझा झाला माझा…’, ‘धड धड…’ आणि ‘संगतीनं तुझ्या…’ ही गाणी रसिकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहेत. ‘धडधड धडधड’ हे गाणं तरुणांची धडधड वाढवत सोशल मीडियात फेमस झालं आहे.
प्रा. यशवंत गोसावी यांनी सांभाळ केलेल्या १०० च्या वर अनाथ मुलांना तमाम सांगली करा कडून “सर्जा ” मराठी ग्रामीण चित्रपट च्या माध्यमातून जमा होणारा निधी सुपूर्त केला जाणार आहे. त्यासाठी सांगली करानी २८ एप्रिल ते ३ मे पर्यंत रोज सायं.७ वाजता एस एफ सी मॉल मध्ये मुक्ता चित्रमंदिर येथे सुरु आहे. त्याचे संपूर्ण बुकिंग फुल्ल केले आहे. यासाठी सांगली करानी मोठा प्रतिसाद दिला आहे. गुंठेवारी चळवळीचे प्रणेते शिवसेना गुंठेवारी समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंदनदादां चव्हाण यांनी चित्रपटासाठी विशेष सहकार्य केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.