प्रतिष्ठा न्यूज

पात्र नागरिकांनी उपलब्ध नोंदीच्या आधारे मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड :- जिल्हयातील विविध विभागातील, कार्यालयातील 1967 पूर्वीच्या जुन्या अभिलेखांची तपासणी करुन त्यात कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी शोधण्याची कार्यवाही चालू आहे. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त पात्र नागरीकांनी उपलब्ध नोंदी आधारे कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.
तपासणीअंती आढळून आलेल्या नोंदींचा अहवाल समितीस वेळीवेळी सादर केला आहे. आढळून आलेल्या सर्व नोंदी जिल्हा संकेतस्थळावर अपलोड करुन सर्वांसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. महसूल विभाग, भूमी अभिलेख, शिक्षण विभाग, सह जिल्हा निबंधक इत्यादींसह विविध शासकीय कार्यालय/ विभागातील जुन्या अभिलेखांची तपासणी करुन कुणबी नोंदींचा शोध घेण्यात आला आहे. आजपर्यत 25 लाख 90168 इतक्या नोंदींची तपासणी करण्यात आली असून त्यात 1 हजार 748 एवढया कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. त्यापैकी 1 हजार 222 नोंदी मोडी लिपीतील असल्याने त्यांचे लिप्यंतर, तर 25 नोंदी उर्दू भाषेतील असल्याने त्यांचे भाषांतर करून सर्व 1 हजार 748 नोंदींचे स्कॅनिंग करुन जिल्हा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
या कुणबी जात नोंदी सर्वसामान्य नागरीकांना सहज उपलब्ध होण्यासाठी आढळून आलेल्या नोंदींची यादी संबंधीत ग्रामपंचायत कार्यालय तसेच तलाठी कार्यालयाचे सुचना फलकावर प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र नागरीकांना जात प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी 17 व 18 जानेवारी रोजी विशेष मोहिम राबवून प्रमाणपत्र मिळवणे बाबत जागृती करण्यात आली आहे. नोंदी तपासणीची आणि आढळून आलेल्या कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी नोंदीच्या आधारे पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही निरंतर चालू आहे. आजपर्यंत 579 पात्र अर्जदारांना कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
नागरीकांनी प्रथमतः त्यांचेशी संबंधीत नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
gov.in/en/talukawise-kunbi-records / या संकेतस्थळावर https://nanded. आपले पुर्वजांचे नावांचा शोध घ्यावा. संबंधीत नोंद सापडल्यानंतर संबंधीत कार्यालयातून नोंदीची प्रमाणित प्रत मिळवावी. उदा. मोडी भाषेतील नमुना ३३ व 34 साठी संबंधीत तालुक्याच्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, प्रवेश निर्गम उतारा संबंधीत शाळेतून तर पत्रक, क-पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही इत्यादी अभिलेखांतील आवश्यक नोंदीच्या प्रमाणित प्रती संबंधीत तहसिल कार्यालयातून विहित शुल्क भरणा करुन प्राप्त करुन घ्याव्यात. प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर नजिकच्या सेतू-सुविधा / सामायिक सेवा केंद्रावर आपला अर्ज सादर करावा. आवश्यकता असल्यास याकामी संबंधीत गावचे तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक यांचे कडून मार्गदर्शन घ्यावे. तसेच तहसिल कार्यालयातील कुणबी मदत कक्षात कार्यान्वित करण्यात आला आहे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.