प्रतिष्ठा न्यूज

कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनींनी केली शिवाजीनगर परिसराची स्वच्छता

प्रतिष्ठा न्यूज 
मिरज : दि न्यू मिरज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. विनायक  गोखले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या कन्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी व स्टाफमार्फत शिवाजीनगर परिसराची करण्यात आली. गेल्या  वर्षापासून 10 जानेवारी हा दिवस संस्थेच्या वतीने स्वच्छता दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. त्यानुसार महाविद्यालय, महापालिकेचे उद्यान, शिवाजीनगर परिसरातील गाजर, गवत काढण्यात आले. ओला कचरा,  सुका कचरा तसेच प्लॅस्टिक गोळा करण्यात आले व सर्व परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.  जमा झालेला सर्व कचरा महापालिकेकडे सुपूर्त करण्यात आला.
           या स्वच्छता मोहिमेचे संयोजन कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. सुरुवातीला संस्थेचे सचिव श्री. राजू झाडबुके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास माळकर, उपप्राचार्या डॉ. सुनिता माळी, पर्यवेक्षिका प्रा. नलिनी प्रज्ञासूर्य यांनी गोखले साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या व निरोगी दीर्घायुष्य चिंतिले. या मोहिमेत रासयो कार्यक्रम अधिकारी डॉ. माधुरी देशमुख, प्रा. तुषार पाटील, डॉ. बाबासाहेब सरगर, प्रा. भाग्यश्री मंडले यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएस स्वयंसेविका, एनसीसी कॅडेट्स तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.