प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी शाहू विद्यालयाचा वसंत नगर नांदेड चा विद्यार्थ्यी राज्यपाल पुरस्कार प्राप्त संदीप कोत्तापल्ले याची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शासकीय रुग्णालयात आरोग्य विभागात निवड

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.26 : राजर्षी शाहू विद्यालय वसंतनगर नांदेड येथील माजी विद्यार्थी संदीप रत्नाकर कोत्तापल्ले याची शासकीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना (शासकीय रुग्णालय) मुखेड येथे आरोग्य निरीक्षक ( एम.पी.डब्लयु) या पदावर नुकतीच निवड झाली आहे. संदीप कोत्तापल्ले हा विद्यार्थी हुशार आणि होतकरू आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू विद्यालय नांदेड येथे झाले असून; उच्च माध्यमिक शिक्षण इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत ग्रामीण महाविद्यालय,वसंतनगर,मुखेड येथे झाले आहे. विशेषतः संदीप ला बालपणापासून क्रिकेट, बॅडमिंटन या खेळाची आवड असून तो विभागीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत राज्यस्तरावर खेळाडू आहे तसेच त्याला आदर्श स्काऊट म्हणून राज्यस्तरीय राज्यपाल पुरस्कार पटकावला आहे स्काऊट राज्यपाल पुरस्कार प्राप्त विद्यार्थी आरोग्य विभागात नोकरीस रुजू झाला आहे. विशेष म्हणजे त्याचे वडील विज्ञान विषयाचे अध्यापक आहेत. तर आजोबा माधवराव कोत्तापल्ले गुरुजी ( माजी शिक्षण विस्तार अधिकारी) यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आहे. स्काऊट राज्यपाल पुरस्कार प्राप्त विद्यार्थी संदीप कोत्तापल्ले याची आरोग्य विभागात रूजू झाल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक बालाजी हंगरगे उपमुख्याध्यापक डॉ. पांडुरंग यमलवाड पर्यवेक्षक पंजाबराव सावंत ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक आर डी देशमुख सुभाषराव तिवडे डॉ. तुकाराम जाधव व सकाळ सत्र व दुपार सत्रातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.