प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज स्कूलचे उन्हाळी शिबिर उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : केंब्रिज स्कूल मध्ये दिनांक 12 एप्रिल ते 24 एप्रिल या दरम्यान उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण 29 मुले व मुलींनी सहभाग घेतला. या शिबिरामध्ये सर्व मुलांना योगा, साहसी खेळात रोप क्लाइंबिंग, क्राउलिंग, रायफल शूटिंग, झुंबा, नृत्य, आर्ट अँड क्राफ्ट, तायक्वांदो, फुटबॉल, हॉर्स रायडिंग या खेळाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर मुलांना क्रीडा संकुल, मिरज येथे जलतरणचे प्रशिक्षण देऊन पोहण्यास शिकवले गेले. याबरोबर मुलांना पन्हाळा, जि. कोल्हापुर येथे एक दिवसीय ट्रेकिंग घेण्यात आले. शेवटच्या दिवशी सर्व सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांना आमंत्रित करून मुलांनी नृत्य तसेच त्यांनी तयार केलेले क्राफ्ट वर्क व ड्रॉईंग सादर करण्यात आले. शिबीरात सर्व मुलांनी उत्साह दाखवला. यावेळी उपस्थित पालकांनी शिबिराबद्दल अतिशय सुंदर झाला असा शेरा दिला. या सर्वांना शाळेचे अध्यक्ष संस्थापक पृथ्वीराज पाटील, शाळेचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील, शाळेच्या अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, माध्यमिकचे मुख्याध्यापक साहेबलाल शरीकमसलत यांचे मोलाचे सहकार्य लाभले. हे उन्हाळी शिबिर संपन्न होण्याकरिता क्रीडाशिक्षक दीपक शेलार, सोमनाथ बलगुडे, जयश्री बिरंगे, चंद्रशेखर कांबळे व सत्तूभाई कुडचे या सर्वांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.