प्रतिष्ठा न्यूज

तीर्थंकर एज्युकेशन सोसायटीच्या ज्युनिअर कॉलेज ला परवानगी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : येथील तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी या संस्थेस ज्युनिअर कॉलेज ( अकरावी व बारावी विज्ञान ) शैक्षणिक वर्ष 2024 – 2025 पासून सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे.
याच संस्थेच्या वतीने डॉ. शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी( एम फार्म ,बी फार्म ,डी फार्म) हे नॅक बी प्लस प्लस मानांकन प्राप्त कॉलेज गेली सात वर्षे सुरू आहे . संस्थेच्या वतीने महावीर स्टेट अकॅडमी ही सीबीएससी मान्यता प्राप्त इंग्रजी माध्यमाची शाळा ही उत्कृष्टपणे सुरू आहे
विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणार असल्याचा मनोदय संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी व्यक्त केला यावेळी या ज्युनिअर कॉलेजच्या मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक श्री डी डी चौगुले सर यांचा रावसाहेब पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार केला
या प्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री पोपटलाल डोरले ,अजित प्रसाद पाटील, प्रशांत अवधूत, महावीर चौगुले ,डॉ. किरण वाडकर ,नितीन चौगुले ,सुदर्शन शिरोटे व शिक्षक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.