प्रतिष्ठा न्यूज

तरुण भारत बाजारच्या नूतन संचालकाचा सत्कार सोहळा संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : तरुण भारत को-ऑपरेटिव्ह ग्राहक स्टोअर लिमिटेड सांगली च्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये स्वर्गीय खासदार अण्णासाहेब गोटखिंडे सहकार पॅनलचा पॅनल प्रमुख माननीय यशवंतराव दादा गोटखिंडे यांच्या नेतृत्वाखाली 17 पैकी 17 जागेवर एकतर्फी विजय प्राप्त झाला या नूतन सर्व संचालक मंडळचा सत्कार नितीन काका शिंदे मित्रपरिवार व सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने सांगलीमध्ये सांगली,मिरज, कुपवाड मनपाच्या माजी नगरसेविका सौ आशाताई शिंदे व सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष माननीय सुनील भाऊ पिराळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्वांचा शाल, श्रीफळ,फेटा व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या वेळेला या सर्व कार्यक्रमाचे संयोजक व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त माननीय नितीन काका शिंदे म्हणाले की जिल्ह्यामध्ये तरुण भारत व्यायाम मंडळ व तरुण भारत बाजार यामध्ये तरुण भारत व्यायाम मंडळ प्रामुख्याने कबड्डी क्षेत्रातील नावाजलेले मंडळ आहे राज्य व देशपातळीवर खेळाडू तयार करण्याची या मंडळाकडे खान आहे मी सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनचा कार्यवाह व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचा सदस्य म्हणून आपणाला लागेल ते मदत मी करण्यास तयार आहोत व या पॅनलचे यशवंतराव दादा गोटखिंडे या व्यक्तीकडे कुठलाही गर्व नसून खासदारचा मुलगा असून सुद्धा त्यांचे पाय जमिनीवरच असतात व तरुण भारत बाजार या संस्थेला भविष्यात प्रगतीपथावर नेतील अशा शुभेच्छा देतो व ते करून दाखवतील. यावेळेला पॅनलचे प्रमुख यशवंतराव गोटखिंडे दादा म्हणाले सर्व सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला बहुमताने एकतर्फी विजय केल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार व भविष्यकाळात आमच्यावर विश्वास ठेवलेल्या सर्व सभासदां च्या विश्वासाला कुठेही तूसबर सुद्धा तडा जाऊ देणार नाही व तरुण भारत बाजार सांगलीत एक नंबरला आणण्याचा आम्ही कोशिशीने प्रयत्न करणार. या वेळेला सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष माननीय सुनील भाऊ पिराळे साहेब म्हणाले की सराफ कट्टा व सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या सर्व सभासदांनी यशवंतराव दादा गोटखिंडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्व. खासदार अण्णासाहेब गोटखिंडे सहकार पॅनलला आम्ही भरघोस मतांनी निवडून आणले त्यामुळे भविष्यकाळात सर्व सराफ कट्टा ग्रुप व सराफ कट्टा मॉर्निंग ग्रुपच्या वतीने जी काही मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहेत याची ग्वाही दिली.या वेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की सभासदांनी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून एकतर्फी पॅनल निवडून देणाऱ्या सभासदांना विश्वासात घेऊन भविष्यकाळामध्ये अनेक कंपन्या म्हणजेच बिग बाजार,डी मार्ट, रिलायन्स यांच्या तोडीस तोड आपली संस्था झाली पाहिजे तरुण भारत व्यायाम मंडळ हे कबड्डी मधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आहे त्यामुळे भविष्यकाळात भारतामध्ये होणाऱ्या कबड्डी प्रीमियर लीग मध्ये तरुण भारतचे खेळाडू दिसतील व ते त्यांनी निर्माण करावे त्याला लागल ते मदत आम्ही करू. या वेळेला महापालिकेचे अधिकारी काका हलवाई म्हणाले की महानगरपालिका कडून जी काही मदत लागेल ती आम्ही करण्यास तयार आहोत व भविष्यकाळात तरुण भारत बाजार व तरुण भारत व्यायाम मंडळ हे राज्यामध्ये नंबर एक मध्ये आणण्याचा प्रयत्न करू. या वेळेला राजाभाऊ रामचंद्रे, सुधाकर नार्वेकर,सांगली अर्बन बँकेचे संचालक एडवोकेट रणजीत भैय्या चव्हाण, गणेश पवार, भारत ताटे,नकुल जकाते, संजय काळेबेरे,सुरेश तात्या जाधव, राजेंद्र कासार,सनी भोई, खंडू हलवाई,विनायक विभूते, नितीन चव्हाण, कुमार कोठारी, रवी काळेबेरे, राज शिंदे, व इतर उपस्थित राहून सर्वांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला व शेवटी चंद्रकांत मालवणकर यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.