प्रतिष्ठा न्यूज

19 जानेवारी शिवजन्मोत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम व प्रसिद्ध व्याख्याते डॉ.बालाजी जाधव यांचे व्याख्यान

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड : येथे मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्षाच्या वतीने सार्वजनिक शिवजन्मोत्सव गेल्या तिस वर्षांपासून अखंडपणे नवामोंढा येथे भव्य स्वरुपात होत असतो.त्याच प्रमाणे याही वर्षी दि 19 फेब्रुवारी 2023 रोजी विविध कार्यक्रमासह भव्य मिरवणुकीची आयोजन करण्यात आले असून प्रसिद्ध व्याख्याते डॉ बालाजी जाधव यांचे व्याख्यान होणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नांदेड येथील नवामोंढा मैदानावर शिवजन्मोत्सवा निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.दि.19 फेब्रुवारी सकाळी 10 वाजता मुख्य कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री- मा. अशोकराव चव्हाण तर उद्घाटक म्हणून खासदार- प्रतापराव पाटील चिखलीकर, तसेच जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. शाहीर गजानन जाधव यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम सकाळी होणार आहे. शिवजन्मोत्सवा निमीत्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी करण्यात येणार आहे, (1) डॉ.शुभांगी पतंगे- डॉ. “रख्माबाई सावे’ पुरस्कार, (2) डॉ.ऋतुराज जाधव- “मराठा भुषण” पुरस्कार, (3) गिरजाबाई पवार- “जिजाऊ रत्न” पुरस्कार, (4) विक्रांत खेडकर- “छत्रपती संभाजी महाराज शोर्य” पुरस्कार (5) राजाराम शिंदे- “मराठा सेवा संघ कृषी भुषण” पुरस्कार देण्यात येणार असुन या कार्यक्रमा नंतर भव्य मिरवणूकीस सुरुवात होईल या मिरवणुकीत विविध देखावे, लेझीम पथक, लाठीकाठी पथक, तलवारबाजी पथक, शिवकालीन देखावे, छत्रपती शिवाजी महाराज जन्म पाळणा गिताद्वारे देखावा, ढोलताशा पथक, भजनी मंडळ आदिंचा समावेश असेल.
या शिवजन्मोत्सवास हाजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक- कामाजीराव पवार, मधुकरराव देशमुख, इंजि शे.रा. पाटील, शिवाजीराव खुडे, प्रा.डॉ.पंजाब चव्हाण, इंजि.सुदेश देशमुख, डॉ.सोपानराव क्षिरसागर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- भगवान कदम, स्वागताध्यक्ष तथा संभाजी ब्रिगेड नांदेड जिल्हाध्यक्ष- सुभाष कोल्हे पाटील, जिजाऊ ब्रिगेड प्रदेश उपाध्यक्षा- सरस्वती धोपटे, प्रदेश प्रवक्त्या- डॉ.भारती मंढवई, प्रा.संतोष देवराये, व्यंकटराव जाधव, शिवाजी पाटील, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष- संकेत पाटील, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष- उद्धव सुर्यवंशी, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष- नानाराव कल्याणकर, सतीश जाधव, जिल्हा सचिव- रमेश पवार, पी.के.कदम, पंडित कदम, पंडीत पवळे, जे.डी.कदम, प्रल्हाद दुरपडे, बळीराम फाजगे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- डाॅ.विद्या पाटील, अरूणा पाटील, संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष- परमेश्वर शिवजन्मोत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख- बालाजी सिरसाट, प्रदीप गुबरे, संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष- सतीश धुमाळ, मराठा सेवा संघ कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष- चंद्रशेखर कदम, व्ही बी व्ही पी चे जिल्हाध्यक्ष- इंजि प्रवीण जाधव, आदिंसह अनेकांची उपस्थिती राहणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.