प्रतिष्ठा न्यूज

शिक्षक भरतीच्या खाजगीकरण विरोधात शिक्षक सेनेच्यावतीने 20 सप्टेंबर रोजी “ढोल बजाओ” आंदोलन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : राज्य सरकारने शिक्षक भरतीचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दि.20 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर सकाळी-11:00 वाजता “ढोल बजाओ” आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
शासनाच्यावतीने बाह्य यंत्रणेकडून कामे करुन घेण्यासाठी सेवापुरवठाधारक एजन्सीची नियुक्ती करणेबाबतचा शासननिर्णय ज्यात जिल्हा परिषद शिक्षक कंत्राटी भरती विविध खाजगी कंपन्यांकडे देण्यात आली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना सेवासातत्य, वेतनवाढ, नियमित सेवा, वेतनहमी, सेवेची हमी इत्यादीस मुकावे लागणार आहे. राज्यातील 6200 जिल्हा परिषद शाळांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचे धोरण आहे. यामुळे प्रशासकीय कामकाजातील गतिमानता, कार्यप्रवणता डबघाईस जाणार असून यामुळे भावी शिक्षकांचे भवितव्य उध्वस्त होणार आहे, असे शिक्षक सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. सदरील शासन निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा यासाठी जिल्हा परिषदेसमोर दि.20 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी “ढोल बजाओ’ आंदोलन करण्यात येणार आहे. मा.जिल्हाधिकारी व मा. मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर शिक्षक सेनेचे राज्य- उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण, जिल्हाध्यक्ष- संतोष अंबुलगेकर, सरचिटणीस- रवी बंडेवार, जिल्हा संघटक- प्रकाश कांबळे, सल्लागार- शिवाजी पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.