प्रतिष्ठा न्यूज

कृषी सहाय्यक औताडेचीं बेहिशोबी मालमत्ता जप्त करा – अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : कृषी सहाय्यक खाजगी सावकार दत्तात्रय औताडे यांने कोल्हापूर कृषी कार्यालयामध्ये मोठया प्रमाणावर अपहार करून व तासगाव तालुक्यामध्ये सर्व सामान्य लोकांना व्याजाने पैसे देऊन मोठया प्रमाणावर बेहिशोबी मालमत्ता मिळवलेली आहे. त्याची चौकशी करून ती जप्त करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.मनसे नेते अमोल काळे यांनी यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी याणा निवेदन दिल आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी सांगितले की कौलगे येथील खाजगी सावकार व कृषी सहाय्यक दत्तात्रय भगवान औताडे यांच्या विरोधात तासगाव पोलीस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल झाला आहे.त्यानंतर कृषी विभागातर्फे औताडे याला निलंबित ही करण्यात आले आहे.परंतु कोल्हापूर जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी आपल्या कार्यालयाकडून झालेली दिसून येत नाही.तरी या विषयाची चौकशी तात्काळ सुरू करावी.
दत्तात्रय औताडे याने कृषी विभागात भ्रष्टाचार करून १) तासगांव तालुक्यातील वासुंबे ग्रामपंचायत हद्दीमध्ये चार मजली इमारत बांधली आहे. २) पलूस शहरामध्ये हॉटेल हौसाई शेजारी २ बी.एच.के.प्लॅट आहे. ३) तासगांव तालुक्यातील कौलगे गावचे शेतकरी भास्कर / जालिंदर भिवा मंडले यांची ४० गुंठे जमीन व्याजाच्या रक्कमेत दत्तात्रय औताडेचा मुलगा रजनीकांत औताडे याचा नावांवर केली आहे. ४) पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये खुली जागा खरेदी केली आहे.तसेच त्यांने आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या नावावर विविध बॅकेची खाते काढून कृषी विभागात अपहार केलेला पैसा ठेवलेला आहे.
त्या नातेवाईकांची नावे पुढील प्रमाणे:- १) दत्तात्रय भगवान औताडे स्वतः २) छबुताई दत्तात्रय औताडे पत्नी ३) शालन हणमंत माने बहिण / सासू येळावी तालुका तासगांव ४) बाळासाहेब भगवान औताडे भाऊ ५) आक्काताई भगवान औताडे आई ६) शोभाताई शिंदे बहिण तासगांव शहर ७) अमोल महादेव कदम भाचा बांबवडे तालुका पलुस इ. नातेवाईकांची नावे आहेत. त्याच बरोबर बॅकांची नावे पुढील प्रमाणे १) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा- कौलगे, बस्तवडे या शाखेत सर्वाधिक व्यवहार झाले आहेत. २) पलुस सहकारी बँक शाखा – तासगांव ३) सत्यविजय सहकारी बँक शाखा- तासगांव ४) बाबासाहेब देशमुख सहकारी बँक शाखा- तासगांव ५) भारती सहकारी बॅक शाखा तासगांव ६) राजाराम बापू सहकारी बँक शाखा – पलुस यांचे बॅकेचे लॉकर आहे. ७) युनियन बँक शाखा- तासगांव ८) बँक ऑफ इंडिया शाखा – चिंचणी या सर्व बँकामध्ये त्यांचे व त्याच्या वरील नातेवाईकांच्या खात्यावर मोठया प्रमाणावर पैसे जमा केलेले आहेत.
त्याच प्रमाणे कृषी सहाय्यक व खाजगी सावकार दत्तात्रय औताडे याला महाराष्ट्र शासन चा २८ मार्च २००५ च्या शासन निर्णयानुसार सरकारी कर्मचाऱ्याला २ अपत्य असने बंधन कारक आहे.परंतु औताडे यांना तिसरे अपत्य आहे.हे शासनाच्या नियमात बसत नाही व त्याला तिसऱ्या अपत्याचा जन्माचा दाखला पुरावा म्हणून जोडत आहे.एकूणच हा सर्व प्रकार गंभीर स्वरूपाचा असून,वरील सर्व विषयांची सखोल चौकशी करून आपल्या कार्यालयाकडून ८ दिवसाचा आत योग्य ती कारवाई करून त्याच्याकडे असणारी बेहिशोबी मालमत्ता शासन जमा करावी व तिसऱ्या अपत्या बाबत बडतर्फ करण्यात यावे.अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अमोल काळे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.